लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून देशातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. राजकीय नेते ठिकठिकाणी निवडणुकीच्या प्रचारसभा घेत आहेत. यामुळे कार्यकर्त्यांमध्येही चांगलाच उत्साह संचारला आहे. अशातच पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कूचबिहारमध्ये भाजप आणि तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या हाणामारीत दोन्ही बाजूचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहे. भररस्त्यात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल केले असून काहींना अटक देखील केल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि कूचबिहार लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार निशीथ प्रामाणिक मंगळवारी (ता. १९) रात्री दिनाहाटा येथील एका कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते घरी जात असताना तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भररस्त्यात त्यांची कार अडवत गोंधळ घातला. (Latest Marathi News)
या घटनेची माहिती मिळताच भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. यावेळी भाजप आणि तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक देखील केली. या घटनेत अनेकजण जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. यामध्ये उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यासह काही पोलीस देखील जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, भाजपच्या कार्यकर्त्यांनी जाणून बुजून तृणमुल काँग्रेसच्या समर्थकांना मारहाण केल्याचा आरोप उत्तर बंगालचे विकास मंत्री उदयन गुहा यांनी केलाय.
दुसरीकडे तृणमुल काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्यावर धावून आल्याने भाजप कार्यकर्त्यांनी बचाव केल्याचं केंद्रीय गृह राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला असून काहींना अटक देखील केल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.