Loksabha Election 2024: PM मोदींच्या विजयासाठी अमेरिकेत होमहवन; भाजपच्या यशासाठी भारतीयांनी केली प्रार्थना

PM Naredra Modi News: आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपला प्रचंड बहुमत मिळावं यासाठी अमेरिकेत होमहवन करण्यात आलं आहे.
PM Narendra Modi Lok Sabha 2024 Election
PM Narendra Modi Lok Sabha 2024 Election Saam TV

PM Narendra Modi Lok Sabha 2024 Election

आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपला प्रचंड बहुमत मिळावं यासाठी अमेरिकेत होमहवन करण्यात आलं आहे. भारतीय-अमेरिकन तंत्रज्ञान व्यावसायिकांनी सिलिकॉन व्हॅलीतील एका हिंदू मंदिरात हे होम हवन केलंय. या हवनासाठी अनेकजण मंदिरात आले होते. यावेळी काहींनी 'अबकी बार ४०० पार' असा नारा देखील दिला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

PM Narendra Modi Lok Sabha 2024 Election
Narendra Modi: आम्ही 'शक्ती'विरोधात लढतोय, राहुल गांधींच्या वक्तव्यावर PM मोदी संतापले; भर सभेतून दिला इशारा

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून देशात ७ टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला होणार आहे. तर ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यापार्श्वभूमीवर राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. (Latest Marathi News)

केंद्रातील मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची मोट बांधली आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 'अबकी बार ४०० पार'चा नारा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत एनडीएला ४०० तर भाजपला ३७० हून अधिक जागा मिळतील, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात पुन्हा भाजपची सत्ता यावी यासाठी अमेरिकेतील ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी (OFBJP) आणि USA San Francisco Bay-Area Chapter यांच्यातर्फे होमहवनाचे आयोजन करण्यात आले होते. या हवनात अनेक भारतीय-अमेरिकन तंत्रज्ञान व्यावसायिकांनी सहभागी झाले होते.

या हवनाच्या संदर्भात जारी करण्यात आलेल्या मीडिया रिलीझमध्ये म्हटलंय की, "हा केवळ एक विधी नाही, तर बहुसंख्य भारतीयांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी केलेला यज्ञ आहे. आगामी काळात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपच्या विजयासाठी येथे अनेक लोक प्रार्थनेसाठी येतील". यावेळी 'अबकी बार ४०० पार'च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

PM Narendra Modi Lok Sabha 2024 Election
Electoral Bond: इलेक्टोरल बाँडमधून निधी कसा मिळाला? पक्षांकडून अजब-गजब दावे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com