Electoral Bond: इलेक्टोरल बाँडमधून निधी कसा मिळाला? पक्षांकडून अजब-गजब दावे

Electoral Bonds: निवडणूक आयोगाने रविवारी इलेक्टोरल बाँड्सबाबत नवीन माहिती सार्वजनिक केली आहे. कोणत्या पक्षाला कोणत्या कंपनीकडून किंवा व्यक्तीकडून किती देणगी मिळाली याबाबतची ही माहिती आहे.
Election Commission On Electoral Bond
Election Commission On Electoral BondSaam Tv

Electoral Bond News:

निवडणूक आयोगाने रविवारी इलेक्टोरल बाँड्सबाबत नवीन माहिती सार्वजनिक केली आहे. कोणत्या पक्षाला कोणत्या कंपनीकडून किंवा व्यक्तीकडून किती देणगी मिळाली याबाबतची ही माहिती आहे. मात्र यामध्ये काही पक्षांकडून अजब दावेही करण्यात आले आहेत. यामध्ये नितीश कुमार यांच्या जनता दलाने आमच्या ऑफिसबाहेर एका लिफाफ्यात कोणीतरी १० कोटी ठेऊन गेल्याचे म्हटले आहे.

राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या डेटामध्ये 2018 मध्ये योजना सुरू झाल्यापासून नोव्हेंबर 2023 पर्यंतचा कालावधी समाविष्ट आहे. या आकडेवारीनुसार रोख्यांच्या माध्यमातून भाजपला सर्वाधिक ६,९८६.५ कोटी रुपये मिळाले. त्यानंतर पश्चिम बंगालचा सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसला 1,397 कोटी रुपये, काँग्रेसला 1,334 कोटी रुपये आणि भारत राष्ट्र समितीला 1,322 कोटी रुपये मिळाले आहेत.

मात्र, बहुतांश पक्षांनी देणगीदारांची नावे जाहीर केलेली नाहीत. काही पक्षांनी अजब दावेही केले आहेत. यामध्ये जनता दलाने त्यांना कार्यालयात एक लिफाफा सापडला, ज्यामध्ये 10 कोटी रुपयांचे रोखे होते, असे निवडणूक आयोगासमोर सांगितले आहे. तसेच समाजवादी पक्षानेही त्यांना पोस्टाद्वारे 10 कोटी रुपयांचे रोखे मिळाले. मात्र ते कोणी पाठवले हे कळाले नसल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर DMK ला एकूण देणगीच्या 77% रोखे एकाच कंपनीकडून मिळाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Election Commission On Electoral Bond
Dodamarg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग परिसरात पट्टेरी वाघाचे दर्शन, अस्तित्व अधोरेखित

दरम्यान, इलेक्ट्रॉनिक बॉन्ड संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी पार पडली. यामध्ये एसबीआयचे चेअरमन यांना गुरुवारी म्हणजेच 21 मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजण्यापूर्वी सर्व माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागणार आहे. सोबतच याबाबतचे प्रतिज्ञापत्रही सुप्रीम कोर्टात सादर करावे लागणार आहे, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहेत. (Latest Marathi News)

Election Commission On Electoral Bond
Ashok Chavan News : ते विधान चुकीचे व हास्यास्पद; राहुल गांधी यांच्या विधानावर अशोक चव्हाण यांचे उत्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com