Bikini Girl With Crocodile Video saam tv
व्हायरल न्यूज

Girl Swims With Crocodile: बिकिनी गर्लने मगरीसोबत केली स्विमिंग! भीतीदायक Video पाहून नेटकरी धक्क्यात

Girl With Crocodile Video: व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगी एका भल्यामोठ्या मगरीसोबत पाण्यात पोहोताना दिसत आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Bikini Girl Swims With Crocodile Video Viral: मगर म्हटलं की कुणालाही भीती वाटेल. आक्राळविक्राळ दिसणारी मगर एखाद्या तलावात असेल तर त्यात उतरण्याची हिम्मत कदाचितच कोणी करेल. परंतु सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओने नेटकऱ्यांना आश्चर्यचकित केले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगी एका भल्यामोठ्या मगरीसोबत पाण्यात पोहोताना दिसत आहे. ख्रिस्तोफर जिलेट असे या मुलीचे नाव असून तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी विचारात पडले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

निर्भयपणे मगरीसोबत पोहतेय मुलगी

तुम्ही पाहू शकता या व्हिडिओत एक बिकिनी घातलेली सुंदर मुलगी एका मोठ्या मगरीसोबत पाण्याखाली शांतपणे पोहताना दिसत आहे. ती अतिशय निर्भयपणे मगरीसोबत पोहत आहे. एवढंच नाही तर ती अनेकदा पोहताना मगरीला हात देखील लावताना दिसत आहे. एवढे होऊनही मगरीने तिच्यावर हल्ला केला नाही. ही मगर पाण्याच्या वरच्या बाजूला असलेला पालापाचोळा खण्याचा प्रयत्न करत असल्याचे तुम्ही पाहू शकता.

पूर्णपणे प्रशिक्षित आहे तरुणी

ही तरुणी प्रशिक्षित असून तिने पूर्ण प्रशिक्षणानंतरच मगरीसोबत स्विमिंग केली आहे. तिने हा व्हिडिओ शेअर करताना एक मोठं कॅप्शन लिहिले आहे. त्यात तिने "येथे @gabbynicolle कॅस्परसोबत पोहण्याचा आनंद! असे लिहिले आहे. तिने पुढे गॅबी अनेक वर्षांपासून मगर हाताळत आहे! हा व्हिडिओ गेल्या वीकेंडचा आहे. तुम्ही मला आणि कॅस्परला पाहू शकता. एकत्र पोहायला जाऊ शकता! (Viral News)

तुम्हीही बुक करू शकता

या तरुणीने लिहिले की, तुम्हालाही मगरीसोबत असेच काही करायचे असल्यास, तुम्ही आत्ता ऑनलाइन बुक करू शकता, www.crocodilechris.com ला भेट द्या. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, "तुम्हाला भेट द्यायची असल्यास वेबसाइटशी लिंक करा. हे होमस्टेड, फ्लोरिडा येथील एव्हरग्लेड्स आउटपोस्ट वन्यजीव बचाव पथकाने सुरक्षितपणे केले आहे. हे कोणत्याही कौशल्य स्तरावरील लोकांसाठी आहे." (Viral Video)

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

या व्हिडिओला आतापर्यंत 3 लाख 77 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. एका इंस्टाग्राम यूजरने गंमतीने लिहिले की "हे का आवश्यक आहे?" दुसर्‍याने विचारले "या बाईकडे किती हिम्मत आहे. कदाचित मी माझ्या कामात इतकाच आनंदी असतो." आणखी एकाने लिहिले की "तिला भीती वगैरे काहीच वाटत नाही का?" तर एकाने लिहिले की "ती कॅमेर्‍यासाठी मॉडेलप्रमाणे पोहत आहे." (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : अजित पवारांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार, लाईव्ह अपडेट

Thursday Horoscope: अहंकारामुळे वाद होण्याची शक्यता, ४ राशींनी टाळा प्रवास; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

कामाचा माणूस! ४६ वर्ष राजकारण, 6 वेळा उपमुख्यमंत्री; अजितदादांचा राजकीय प्रवास, VIDEO

वक्तशीर, कठोर शिस्तीचे अन् तितकेच दिलखुलास; अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्र हळहळला, वाचा खास रिपोर्ट

Ajit Pawar Death : काम करण्याची वेगळी आणि शिस्तबद्ध शैली होती; अजित पवारांच्या निधनानंतर प्रकाश आंबेडकरांची भावुक पोस्ट

SCROLL FOR NEXT