Benglutu Dog Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking: मोलकरणीचं भयंकर कृत्य, लिफ्टमध्ये कुत्र्याला आपटून आपटून मारलं; पाहा VIDEO

Benglutu Dog Video: बंगळुरूमध्ये भयंकर घटना घडली. मोलकरणीने लिफ्टमध्ये कुत्र्याची निर्घृण हत्या केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

Summary -

  • बंगळुरूच्या मोलकरणीने लिफ्टमध्ये कुत्र्याची हत्या केली

  • बगलूर भागातील सोसायटीत ही घटना घडली

  • सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटना कैद झाली

  • या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे

मोलकरणीने लिफ्टमध्ये कुत्र्याची आपटून आपटून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगळुरूच्या बगलूर भागामध्ये ही घटना घडली. सीसीटीव्हीमध्ये ही थरकाप उडवणारी घटना कैद झाली असून याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोमवारी ही घटना घडली. मोलकरणीने लिफ्टमध्ये गूफी नावाच्या कुत्र्याची हत्या केली. या प्रकरणी कुत्र्याच्या मालकिणीच्या तक्रारीवरून मोलकरणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बगलूर येथील एका सोसायटीच्या लिफ्टमध्ये मोलकरणीने एका कुत्र्याच्या पिल्लाला कपडे आपटतात तसं आपटून आपटून मारलं. हे प्रकरण बगलूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलं. मृत कुत्र्याचे नाव गूफी होते. पुष्पलता असं कुत्र्याची हत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. राशी पुजारी यांच्या घरी पुष्पलता कुत्र्यांची देखभाल करण्याचे काम करत होती. काही महिन्यांपूर्वीच ती राशी यांच्या घरी काम करू लागली होती. पुष्पलताच्या राहण्या आणि खाण्याची सोयी राशी यांनी आपल्याच घरी केली होती.

३१ ऑक्टोबर रोजी राशी यांच्या दोन कुत्र्यांना घेऊन पुष्पलता सोसायटीबाहेर गेली होती. त्याचवेळी लिफ्टच्या आतमध्ये तिने एका कुत्र्याचा जीव घेतला. व्हायरल होणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की, पुष्पलता दोन कुत्र्यांसोबत लिफ्टमध्ये घुसते. लिफ्टमध्ये आल्यानंतर ती एका कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा पकडते आणि त्याला गोल फिरवून कुत्र्याला खाली आपटते. कुत्र्याला ऐवढ्या जोरात मार लागतो की त्याचा जागीच मृत्यू होतो.

त्यानंतर पुष्पलता लिफ्टमधून कुत्र्याचा मृतदेह बाहेर घेऊन पडताना दिसते. जेव्हा कुत्र्याचा मृत्यू झाल्याचे कळाले तेव्हा राशी यांना मोठा धक्का बसला. रडून रडून त्या बेहाल झाल्या. मोलकरणीने राशी यांना सांगितले की, लिफ्टमधून बाहेर पडताना कुत्रा खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. पण जेव्हा राशी यांनी सोसायटीतील सीसीटीव्ही तपासले तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

आपल्याच मोलकरणीने कुत्र्याचा जीव घेतल्याचे पाहून राशी यांना प्रचंड राग आला. त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिलेविरोधात पशू हत्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. सध्या पुष्पलता फरार आहे. या कुत्र्याच्या हत्येचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी त्यावर संताप व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; पगार ४५००० रुपये; पात्रता काय? वाचा सविस्तर

Crime: नवऱ्याने बायकोला जिवंत जाळलं, घराचा दरवाजा बंद करून काढला पळ; चंद्रपूर हादरले

Kitchen Tips : थंडीत भांडी धुताना हात गारठणार नाही, वापरा या सोप्या टिप्स

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर

Cholesterol Diet Mistakes: कोलेस्टेरॉल कमी करताय, पण 'ही' एक सामान्य चूक ठरू शकते घातक; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT