viral video: हरवलेल्या कुत्र्याचे पोस्टर काढल्याने महिलेचा चढला पारा; सोसायटीच्या अध्यक्षाच्या कानशिलात लगावली

Woman Slaps Society President: हरवलेल्या कुत्र्याचे पोस्टर काढल्यामुळे एका सोसायटीच्या अध्यक्षाला महिलेनं मारहाण केल्याची घटना घडली.
 viral video
viral videosaam Tv (X )
Published On

Woman Slaps Society President:

हरवलेल्या कुत्र्याचे पोस्टर काढल्यामुळे एका सोसायटीच्या अध्यक्षाला महिलेनं मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना नोएडा येथील निवासी सोसायटीत घडलीय. महिला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या मारहाणी प्रकरणी नोएडा सेक्टर-११३ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. (Latest News )

स्थानिक पोलीस विभागाने देखील 'X'(आधीच्या ट्विटवर) वर या घटनेविषयी प्रतिक्रिया दिलीय. व्हायरल व्हिडिओमधील महिला “एओए (अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन) सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठी आहे का?” असं म्हणत एका व्यक्तीच्या टी-शर्टची कॉलर खेचताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीला मारहाण झाली आहे, तो नोएडाच्या AIMS गोल्फ अव्हेन्यू सोसायटीचा अध्यक्ष आहे.

व्हिडिओमध्ये महिला सोसायटीच्या अध्यक्षाला धक्काबुक्की करते आणि त्याचे केस ओढत आहे. अध्यक्ष त्या महिलेला व्यवस्थित वागण्यास सांगत आहे. परंतु ती महिला ओरडताना दिसतेय. 'एक्स' या अकाउंटवर मारहाणीचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. त्यावर गौतम बुद्ध नगर पोलीस आयुक्तालयानं प्रतिक्रिया दिलीय. ही घटना नोएडा सेक्टर-७५ सोसायटीचे अध्यक्ष आणि AIMS गोल्फ अव्हेन्यूमधील रहिवाशी महिलेमध्ये कुत्र्याच्या पोस्टरबाबत वाद झाला होता.

याप्रकरणी पोलीस स्टेशन सेक्टर- ११३ नोएडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून प्राथमिक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.दरम्यान सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून अनेक 'X' वापरकर्त्यांनी व्हिडिओवर प्रतिक्रिया दिलीय. व्हिडिओमधील महिला गैरवर्तन करत आहे, तिच्या कारवाई केली गेली पाहिजे असं एक नेटकरी म्हणालाय. तर आणखी एका वापरकर्त्याने म्हटले की, अशा लोकांना तुरुंगात टाकले पाहिजे.

 viral video
Myra Vaikul Video Viral: 'देवबाप्पा का रे सोडून गेला मला...', लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताना चिमुकल्या मायराने फोडला टाहो

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com