Snake Found In Online Package SAAM TV
व्हायरल न्यूज

Snake Found In Online Package Video : ऑनलाईन पार्सल मागवलं, बॉक्समध्ये निघाला भलामोठा साप; काळजात धस्स करणारा व्हिडिओ

Cobra In online Package : ऑनलाईन पार्सलमधून साप बाहेर आल्याचा भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Shreya Maskar

सध्या दररोज सोशल मीडियावर विचित्र व्हिडिओ व्हायरल होताना आपण पाहतो. त्यातील अनेक व्हिडिओंवर विश्वास ठेवणे आपल्याला अशक्य होते. बऱ्याच वेळा हे व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांच्या संवेदना हरवतात. असाच एक भयानक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहताच कोणाचीही किंचाळी निघेल.

आजकाल ऑनलाइन शॉपिंगचे प्रमाण वाढले आहे. अशातच एक भयानक घटना घडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. चक्क ऑनलाइन शॉपिंगच्या पार्सलमधून एक साप निघाला आहे. ही घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. बंगळुरूमधील एका जोडप्याने ऑनलाइन साईट वरून एक वस्तू मागवली होती. त्या पाकिटातून जिवंत साप बाहेर आला आहे. हे पाहताच जोडप्याला मोठा धक्काच बसला. या जोडप्याने आधीच साप पाहिला म्हणून चांगले झाले नाहीतर काही तरी अनुचित प्रकार घडू शकला असता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, लाल रंगाच्या बादलीमध्ये ऑनलाइन मागवलेले प्रोडक्ट ठेवलेले पाहायला मिळत आहे. पार्सल उघडताच त्या जोडप्याला साप दिसला. हा साप पार्सला लावण्यात आलेल्या काळ्या टेपमध्ये अडकला होता. साप थरथरत बाहेर येण्याचा प्रयत्न करीत होता. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

या जोडप्याने घटनेचा सविस्तर व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. पोस्ट करताना त्यांनी संबंधित कंपनी विषयीची नाराजी व्यक्त केली आहे. तसेच कंपनीचा निष्काळजीपणा आणि जोडप्याचे प्रसंगावधान व्हिडिओतून दिसत आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने सांगितले की, 'आजकाल माझा ऑनलाइन डिलिव्हरीवरचा विश्वास उडला आहे. काही दिवसांपूर्वी डिलिव्हरी बॉयने मला त्याच्या ऑफिसमधून माझी ऑर्डर घेण्यास सांगितले कारण त्याला वाटले की माझे घर खूप दूर आहे.' अशाच अनेक नाराजीच्या प्रतिक्रिया आपल्याला या व्हिडिओवर पाहायला मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

Nana Patole : 'मला बाजूला केलं नाही, आमच्यात भांडण लावू नका'; नाना पटोलेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT