Tiger Robi Beaten: Saam tv
व्हायरल न्यूज

Tiger Robi Beaten: बांगलादेशच्या 'वाघा'ला कानपूरमध्ये तुडवलं; तिघा-चौघांनी उचलून रुग्णालयात नेलं, VIDEO

Vishal Gangurde

कानपूर : भारत आणि बांगलादेशच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यासाठी पोलिसांची कडक सुरक्षा व्यवस्था आहे. बांगलादेशात झालेल्या हिंदूंवरील अत्याचारामुळे भारतीयांमध्ये राग आहे. यामुळे बांगलादेशविरोधात भारतीय संघाचे सामने खेळले जाऊ नये, अशी मागणी केली जात आहे. याचदरम्यान, कानपूरच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी बांगलादेशच्या सुपरफॅनवर स्टेडियममध्येच मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

कानपूरमध्ये सुरु असलेल्या कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघाचे चाहते आपापसात भिडले. या झटापटीत बांगलादेशचा सुपरफॅन टायगर रॉबी जखमी झाला आहे. त्यानतंर तातडीने टायबर रॉबीला रुग्णालयात दाखल केलं आहे. कसोटी सामन्याच्या लंच ब्रेकदरम्यान ही घटना घडली आहे. या सुपरफॅनने अंगावर टायगरचं चित्र काढलं आहे. बांगलादेशचा सुपरफॅन त्याच्या संघाचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी आला होता.

रॉबीने सांगितलं की, 'काही लोकांनी माझ्या पाठ आणि पोटावर मारहाण केली. मला श्वास घ्यायलाही जड जात आहे. रॉबीने मारहाण केल्याचा दावा केल्यानंतर घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी हल्ला केल्याच्या आरोपांचं खंडन केलं आहे. रॉबीने मारहाण केल्याचा दावा केल्यानंतर पोलीस आता सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहेत. रॉबीला मारहाण केल्यानंतर त्याला धड बोलायलाही जमेना. त्याला काही जणांनी उचलून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे दिसत आहे.

बांगलादेशच्या संघाची प्रथम फलंदाजी

बांगलादेशचा संघ कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत आहे. नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशला पहिल्या सत्रात दोन झटके बसले. तर दुसऱ्या सेशनमध्ये एक झटका बसला. पाऊस आणि मैदान ओले असल्यामुळे सामना वारंवार थांबवावा लागत आहे. दुसरं सत्र उशिराने सुरु झालं. दुसरं सत्रादरम्यान, ३५ षटकानंतर पुन्हा एकदा खेळ थांबवण्यात आला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारताच्या रणरागिणी पाकिस्तानवर पडल्या भारी! हरमनप्रीत शेवटपर्यंत लढली

Mumbai Accident: पश्चिम द्रुतगती महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात, गोरेगाव ते मालाड दरम्यान वाहतूक कोंडी

Marathi News Live Updates : जयंत पाटलांनी पैसे वाटल्याचे आरोप सिद्ध करावेत, दीपक केसरकरांचं खुलं आव्हान

VIDEO : स्मारकाच्या शोधत राजे; महाराजांच्या नावाने खेळ करू नका, संभाजीराजेंनी दिला इशारा

Jayant Patil : पटेलांच्या पुतळ्यापेक्षा कोणताही पुतळा उंच असू नये, हे ठरवलंय ; जयंत पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT