Baby in a Pod ScienceNaturePage
व्हायरल न्यूज

Baby in a Pod : मशीनमधून जन्माला येणार मूल? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Baby in a Pod: जर्मनीच्या एक्टोलाइफ कंपनीनं मूल जन्माला घालण्यासाठी आर्टिफिशयल तंत्रज्ञान विकसीत केलंय. यासाठी कंपनीने उच्च तंत्रज्ञानानं सुसज्ज अशा 75 लॅब तयार केल्या आहेत.

Mayuresh Kadav

Baby in a Pod: ज्यांना मूल होत नाही, किंवा ज्या महिला मुल जन्माला घालण्यास असमर्थ आहेत. अशांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी. या महिलांना आता AI टेक्नॉलॉजीद्वारे मातृत्व मिळू शकतं. जन्माला येणारं मुल हे निरोगी तर असेलच शिवाय त्याची बुद्धीमत्ताही उत्तम असेल. सोशल मीडियात याबाबतचा दावा करण्यात आलाय. आम्ही या दाव्याची सखोल तपासणी केली, तेव्हा काय सत्य समोर आलं, पाहा.

बेबी पॉडमधून हाय क्वालिटी मुलांचा जन्म?

सध्या आपल्या देशात वंध्यत्वाची समस्या गंभीर बनलीय. याशिवाय काही गंभीर आजारांमुळे अनेक महिलांना इच्छा असूनही मुल जन्माला घालता येत नाही. मात्र आता काळजी करण्याचं कारण नाही. या महिला कोणत्याही त्रासाविना आई बनू शकतात. यासाठी एक नवं तंत्रज्ञान विकसित झाल्याचा दावा सोशल मीडियात केला जातोय. या महिला AI म्हणजेच आर्टिफिशियल तंत्रज्ञानाद्वारे मुल जन्माला घालू शकतात असा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. या मेसेजसोबत एक व्हिडीओही व्हायरल केलाय जातोय. त्यात नेमकं काय म्हंटलय, पाहा...

व्हायरल व्हिडीओ

जर्मनीच्या एक्टोलाइफ कंपनीनं मूल जन्माला घालण्यासाठी आर्टिफिशयल तंत्रज्ञान विकसीत केलंय. यासाठी कंपनीने उच्च तंत्रज्ञानानं सुसज्ज अशा 75 लॅब तयार केल्या आहेत. प्रत्येक लॅबमध्ये 400 बेबी पॉड आहेत. त्यातून 30 हजार मुलं जन्माला घातली जाऊ शकतात. हे बेबी पॉड म्हणजेच मूल जन्माला घालणाऱ्या मशीन्स आहेत. त्याची रचना गर्भाशयासारखी आहे. बाळाच्या वाढीसाठी आईच्या गर्भशयात ज्याप्रमाणे तापमान आणि वातावरण असतं. तसच वातावरण या बेबी पॉडमध्ये असल्याचा दावा कंपनीनं केलाय. एक्टोलाइफ कंपनीनं मूल कसं जन्माला येणार याची प्रक्रियाही समजावून सांगितलंय.

कसं जन्माला येणार मूल ?

ज्या दाम्पत्याला मूल जन्माला घालण्यात अडचणी आहेत, ते या बेबी पॉडच्या मदतीनं माता-पिता बनू शकतात. या मशीनमध्ये पुरूषाचे शुक्राणू आणि स्त्रीबीज एकत्र केले जातात. त्यानंतर ही मशीन गर्भाशयाप्रमाणे काम करू लागते. 9 महिन्यानंतर मशीनमधून नवजात बाळ जन्माला येतं असा दावा कंपनीनं केलाय.

या बेबी पॉडमध्ये मॉडर्न सेंन्सर लावण्यात आले आहेत. त्यामुळे अॅपद्वारे आई-वडिलांना बाळाच्या वाढीची इत्यंभूत माहिती मिळू शकते. बाळाचे रियल टाईम हार्ड बिट्स, तापमान, ऑक्सिजन लेव्हल, ब्लड प्रेशर, ब्रिदिंग रेट, किडनी, लिव्हरची वाढ या सगळ्या गोष्टींची माहिती ऍपवरून मिळू शकते. इतकच नाही तर बाळाच्या बुद्धिमत्तेचा स्तर, त्याची उंची, केस, डोळ्यांचा रंग, स्किन कलर अॅपद्वारे नियंत्रित करतात येतात.

आता अनेकांना हाच प्रश्न पडलाय, AI तंत्रज्ञानाद्वारे खरंच मूल जन्माला येऊ शकतं का? आम्ही या संशोधनावर खोलवर जाऊन माहिती घेतली. आतंरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या बातम्या पडताळून पाहिल्या. तेव्हा या माध्यमांनीही AI तंत्रज्ञानाला दुजोरा दिला. आम्ही इथवरच थांबलो नाही. या क्षेत्रातल्या जाणकरांशी चर्चाही केली. मूल जन्माला घालण्याबाबतचं आर्टिफिशयल तंत्रज्ञान समजून घेतलं. तेव्हा त्यांनी काय सांगितलंय पाहा.

व्हायरल सत्य

AI तंत्रज्ञानाद्वारे मूल जन्माला येऊ शकतं यावर जर्मनीत संशोधन सुरू आहे. एक्टोलाईफचे संशोधक आणि फिल्ममेकर हाशम-अल-घायली यांनी याबाबत व्हिडीओ जारी केलाय. मात्र प्रत्यक्षात मूल जन्माला आल्याचे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत. हे तंत्रज्ञान प्रचंड खर्चिक आहे. भारतासारख्या देशाला हे तंत्रज्ञान परवडण्यासारखं नाही. प्रत्यक्षात ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यास बरीच वर्ष लागू शगतात. त्यामुळे आमच्या पडताळणीत व्हायरल मेसेजमध्ये AI तंत्रज्ञानाद्वारे मूल जन्माला येत जन्माला येत असल्याचा दावा असत्य ठरलाय. व्हायरल व्हिडीओ ही एक संकल्पना आहे. अशा प्रकारे मूल जन्माला आल्याचं कुठेही सिद्ध झालेलं नाही. भारतातही अशा प्रकारचं कोणतंही तंत्रज्ञान नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मोठी फूट, प्रदेशाध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

SCROLL FOR NEXT