Ashadhi Wari Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Ashadhi Wari Viral Video: जगात भारी, पंढरीची वारी! ८० वर्षाच्या रखुमाईनं धरला असा ठेका; उत्साह पाहून थक्क व्हाल...

Ashadhi Wari Dance Video: संस्कार, संस्कृती अन् परंपरेचं दर्शन घडवणारी ही माणसं ग्रेट आहेत.. असे म्हणत नेटकऱ्यांनी व्हायरल व्हिडिओचे कौतुक केले आहे...

Gangappa Pujari

Ashadhi Ekadashi Viral Video: गेल्या एक महिन्यांपासून सुरु असलेल्या आषाढी वारीची (Ashadhi Wari 2023) काल अखेर सांगता झाली. एक महिन्यांपासून विठुनामाचा गजर करत वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले होते. ज्याचे अनेक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सध्या अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

व्हिडिओमध्ये वयोवृद्ध आजी- आजोबा विठुनामाच्या गजरात नृत्य करताना दिसत आहेत. त्यांचा उत्साह आणि चेहऱ्यावरील आनंद पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.

जगात भारी; पंढरीची वारी...

पंढरीची वारी (Pandhari Wari) म्हणजे साधुसंतांच्या पवित्र महाराष्ट्रातील मोठा सण. भक्तीचा आणि विठुरायाच्या भेटीचा हा सोहळा दरवर्षी मोठ्या भक्तीभावाने पार पडतो. वारीत सहभागी होणारा प्रत्येक वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी आतुर झालेला असतो. कधी एकदा पंढरीला (Pandharpur) जावून विठ्ठल- रखुमाईचं दर्शन घेतो.. अशीच भावना त्या प्रत्येक वारकऱ्याची असते.

वारीमध्ये अगदी आठ वर्षांच्या चिमुकल्यापासून ते ८० वर्षांच्या वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकजण सहभागी होत असतो. यंदाच्या वारीतील अनेक सुंदर व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशाच एका सुंदर व्हिडिओने सध्या सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

काय आहे व्हिडिओ...

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आजी- आजोबा विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेले दिसत आहेत. दोघेही विठुनामाचा गजर करत नृत्य करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये मधेच आजोबा आजीला उचलून थेट कडेवर घेतात अन् ठेका धरतात.

दोघांचा उत्साह अन जोश भल्याभल्यांना थक्क करणारा आहे. विशेष म्हणजे नृत्य करताना, ठेका धरताना आजीनं जराही डोक्यावरला पदर ढळू दिला नाही. तिच्या याच कृतीचं नेटकऱ्यांनी तोंडभरुन कौतुक केले आहे. दोघांचा उत्साह पाहून वारीतील इतर वारकऱ्यांनाही त्यांच्यासोबत नृत्य करण्याचा मोह आवरत नाही.

मीडिया जगत भक्तीमय...

"तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना” या गाण्यावर शूट केलेला हा व्हिडिओ नेटकऱ्यांना खूपच आवडला असून त्यावर अनेकांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी आजीचा डान्स पाहून डोळ्यात पाणी आल्याचे म्हणले आहे.

तर काही जणांनी आजी जेव्हा डोक्यावरचा पदर सावरते.. तेव्हा आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटतो..अशी सुंदर प्रतिक्रिया दिली आहे. थोडक्यात; वारीतल्या या ८० वर्षाच्या विठ्ठल- रखुमाईच्या व्हिडिओने मीडिया जगतही भक्तीमय झाले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

SCROLL FOR NEXT