Delhi Metro Viral Video  Saam Tv
व्हायरल न्यूज

Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रोत पुन्हा राडा! हेअरस्टाईलवरुन दोन प्रवाशांनी एकमेकांना बदडलं; VIDEO व्हायरल

Fighting Viral Video : सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोतील हाणामारीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.ज्यात प्रवाशांच्या हेअरस्टाईल हे कारण अतिशय क्षुल्लक कारण हाणामारीचे बनले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे,असं बोलण्याचे कारण म्हणजे,सोशल मीडियावर कायमच दिल्ली मेट्रोमधील एक एक व्हिडिओ आपल्याला पाहायल मिळत असतात, कधी कपलचे रोमान्स तर कधी चक्क नवरा-बायकोमध्ये हाणामारी.या सर्व घटनेमुळे दिल्ली मेट्रो कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. सध्या पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोमधील एका हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,मात्र या वेळी दिल्ली मेट्रोत झालेल्या हाणामारीचे कारण अतिशय अनोखे आहे.

सध्या लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत या सर्व वयोगटातील व्यक्तींचे विचार आपल्याला वेगवेगळे असलेले दिसून येतात. विचारांपासून ते बोलण्याच्या पद्धती तर कुठे वागण्यापासून ते राहणीमानाची पद्धत या सर्वांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असलेली दिसून आलेली आहे. मात्र हे बोलण्याचे कारण ही तसेच काहीसे आहे, कारण दिल्ली मेट्रोमध्ये झालेल्या हाणामारीचे कारण ही तरुणांच्या हेअर(Hairs) स्टाईलचे आहे.सध्या सोशल मीडियावरील नेटकऱ्यामध्ये दिल्लीतील व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपल्याला दिली मेट्रो दिसून येत आहे.दिली मेट्रोत अनेक प्रवाशांची गर्दीही आहे. त्यात जर तुम्ही व्हिडिओ(Video) पूर्ण पाहिला तर दिसेल की,दोन तरुण दिली मेट्रोत उभे आहेत. काही वेळात या दोन तरुणांमध्ये वादावादी होण्यास सुरुवात होते जर तुम्ही त्याचे नीट बोलणे ऐकले तर समजले त्यांचे वाद त्यांच्या हेअर स्टाईलवर येतात. मात्र दोघ हातापायी करण्यास सुरुवात करतात त्यात तिथे असलेला एक तरुण उठतो आणि त्यांची हातापायी थांबवण्याचा प्रयत्न करतो.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ''इन्स्टाग्राम''वरील 'adultsociet'या अकाउटवर शेअर करण्यात आलेला असून कॅप्शनमध्ये' #DelhiMetroमधील ही लढत पूर्णपणे वेगळ्या पातळीवरची आहे' असे कॅप्शन देण्यात आले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंटबॉक्समध्ये अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्यातील एक यूजर कमेंटबॉक्समध्ये लिहितो की,'फक्त यांचा यात अभिनय जास्त दिसतो आहे',तर आणखी यूजर्सने लिहिले आहे की,'दिल्ली मेट्रोमधील नेहमीचे आहे'. व्हिडिओ साधारण सहा दिवसांपूर्वी पोस्ट(Post) करण्यात आलेला असून व्हिडिओला आतापर्यंत ७५ हजारांच्या घरात लाईक्स आणि मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मतचोरीच्या खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही',: मुख्य निवडणूक आयुक्त

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; नेमकं कारण काय?

Maharashtra Live News Update: पेशवे जयंतीनिमित्त रॅली मध्ये सहभाग घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी चालवली दुचाकी

Priya Bapat: प्रिया बापटचा स्पेशल बॉसी लूक; लवकरच झळकणार नव्या भूमिका

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तानी संघाची घोषणा, PCB चा बाबर आझम-मोहम्मद रिझवानला धक्का

SCROLL FOR NEXT