आतापर्यंत तुम्ही अनेक वाहने पाहिले असतील. वेगवेगळ्या डिझाइनच्या कार, बाईकने आपण प्रवास करतो. कधीकधी तर आपण घोडागाडी, बैलगाडीने प्रवास करतो. पण, तुम्ही कधी सोफ्याची गाडी पाहिलीयेत का? परदेशात दोन तरुणांनी अशीच एक सोफ्याची गाडी बनवली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
प्रसिद्ध उद्योगजक आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्यांनी या अनोख्या वाहनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Viral News In Marathi)
सोशल मीडियावर जुगाडचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत . परंतु दोन तरुणांनी चक्क आरामदायी प्रवास व्हावा म्हणून सोफ्याचीच गाडी बनवली आहे. या व्हिडिओत दोन तरुणांनी सोफ्याची गाडी बनवून ती रस्त्यावर चालवली आहे. त्यांनी हे वाहन बनवण्याची प्रोसेसदेखील दाखवली आहे. सर्वात आधी सोफा ऑर्डर केला. त्यानंतर काही तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याची गाडी बनवली आणि रस्त्यावर चालवली. या व्हिडओ आनंद महिंद्रा (Anand Mahindra)यांनी शेअर केला आहे.
'मजेदार प्रोजेक्ट? या प्रोजेक्टमागे केलेली आवड आणि अंभियांत्रिकी (Engineering) मेहनत पाहा. एखाद्या देशाला ऑटोमोबाईलमध्ये महाकाय बनायचे असेल तर त्यांना अशा अनेक गॅरेज शोधकांची गरज आहे. या मुलांना पाहून मला आनंद झाला. जर मी अशी कार रजिस्टर करायला गेलो तर मला RTO अधिकाऱ्याचे हावभाव पाहायचे आहे'. असं कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिले आहे.
या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'टॅलेंटची काही कमी नाही', 'आरामदायी सोफा कार' अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडिओवर आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.