America Viral Story: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका सत्य घटनेवरील व्हिडिओ व्हायरल होत आहे. पालक आणि मुलं यांच्या नात्यातील हा व्हिडिओ पाहून अनेकांना अश्रू अनावर झालेत. पगडी परिधान केलेले एक सरदारजी आणि त्यांच्या शेजारी एक महिला बसलेली आहे. सरदारजी महिलेला एका व्यक्तीची दु:खद कहाणी सांगत आहेत. (Latest Viral Video)
कहाणी सांगताना ते म्हणाता की, एक वृद्ध दाम्पत्य एकत्र राहत असते. त्यातील पत्नी वयानुसार आजारी पडते. तिला अर्धांगवायूचा झटका येतो. पती आपल्याजवळील सर्व पैसे पत्नीच्या उपचारासाठी वापरतो. अंथरुणाला खिळलेली पत्नी पतीच्या जीवावर जगत असते. तिचं खाणं पिणं तसेच सर्व मलमूत्र पती साफ करत असतो. एक दिवस या सर्व गोष्टी अचानक बंद होतात.
महिला नेहमीप्रमाणे झोपेतून उठलेली असते. ती पाहते की पती टेबलवर बसल्या बसल्या झोपला आहे. बराच वेळ होतो. पत्नीचे मलमूत्र साफ करण्यासाठी पती येत नाही. महिलेला वाटतं पतीला झोप लागली असेल. मात्र पतीचा मृत्यू झालेला असतो. पत्नीला ही गोष्ट जेव्हा लक्षात येते तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला रडू आवरत नाही.
बाहेरुन रस्त्याने वाहनांची वर्दळ सुरु असते. तिला ते दिसतही असतं मात्र आपल्या मदतीसाठी तिला कुणालाही हात मारता येत नाही. जळच एक फोन पडलेला असतो. कुणालातरी फोनकरुन याची माहिती द्यावे असं तिला वाटतं. मात्र घरातल्या घरात बेडपासून ५ पावलांच्या अंतरावर असलेला फोन घेण्यासाठी महिलेला तब्बल ४ तास लागतात. चार तासांनी ती आम्हला फोन करते मात्र काहीच बोलू शकत नाही.
काहीतरी घटना घडल्याचे आमच्या लक्षात येते आणि आम्ही तेथे पोहचतो. तेथील दृश्य पाहून आमच्याही पायाखालची जमीन सरकते. आम्ही महिलेला आणि मृत आजोबांना घेऊन दवाखाण्यात येत असतो तितक्यात त्या महिलेचा देखील मृत्यू होतो. या दुर्दैवी घटनेनंतर या दाम्पत्याच्या अमेरिकेत असलेल्या दोन मुलांना आम्ही ही माहिती देतो. त्यावेळी आपल्याला वेळ नसून यायला जमणार नाही. अंत्यविधी करुन घ्या असं मुलं सागंतात.
दोन वर्षांपूर्वी शहीद भगत सिंह सेवा दलाचे जितेंद्र सिंह शंटी यांचा हा व्हिडिओ आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. व्हिडिओपाहून युजर्स यावर रडण्याचे इमोजी शेअर करतायत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.