Karnataka tourists caught on camera dancing and creating chaos on Amboli waterfall road; locals demand action Saam Tv
व्हायरल न्यूज

आंबोली घाटात कर्नाटकातील पर्यटकांचा धुडगूस, धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर हुल्लडबाजी; व्हिडिओ आला समोर

Viral Reels From Amboli: आंबोली घाटातील धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर कर्नाटकातून आलेल्या पर्यटकांनी गाड्या थांबवून नाचगाणी केली. त्यांची ही हुल्लडबाजी कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

Amboli Waterfall: निसर्गरम्य आंबोली घाटात पर्यटकांची वर्दळ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पावसाळा सुरू होताच धबधब्यांच्या नजाऱ्यांना पाहण्यासाठी हजारो पर्यटक आंबोलीकडे गर्दी करत असतात. पण,या पर्यटनस्थळाचं शांत वातावरण गालबोट लावणारी घटना समोर आली आहे. कर्नाटकातून आलेल्या काही पर्यटकांनी धबधब्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अक्षरशः धुडगूस घातला. त्यांच्या हुल्लडबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये(Video) कर्नाटकातील तरुण रस्त्याच्या मधोमध गाड्या थांबवून मोठ्याने गाणी लावून नाचताना, ओरडताना आणि हुल्लडबाजी करताना दिसत आहेत. काहीजण रस्त्यावर उभे राहून 'डान्स पार्टी' करत असल्याचंही स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या इतर पर्यटकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या हालचालींना मोठा अडथळा निर्माण झाला.

धबधब्याकडे जाणारा रस्ता अरुंद असतानाही या पर्यटकांनी बेशिस्तपणे गाड्या रस्त्यावर उभ्या केल्या. त्यामुळे वाहतूक काही वेळेसाठी ठप्प झाली. अनेक पर्यटक आणि प्रवासी यामुळे वैतागले. वाहतूक कोलमडल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली होती. या सगळ्या प्रकाराने स्थानिक लोकांमध्येही संतापाची भावना आहे.

आंबोली परिसरातील स्थानिक नागरिकांनी या प्रकाराला तीव्र विरोध केला आहे. "प्रत्येक वर्षी पावसाळ्यात अशा पर्यटकांकडून(Tourist) शिस्तभंगाच्या घटना घडतात. हे पर्यटनस्थळ आहे की बाजारपेठ? आम्ही प्रशासनाला याविषयी तक्रार करणार आहोत," असे एका स्थानिक नागरिकाने सांगितले. याआधीही अशा घटना आंबोलीत घडल्या असून, अनेकदा पोलीस आणि वन विभाग यांना कारवाई करावी लागली आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT