Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: छेडछाड करणाऱ्या तरुणाला महिलेनं शिकवला धडा, भरचौकात धू धू धुतले; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गेल्या काही वर्षात महिलांची भररस्त्यात छेड काढणाऱ्या घटनांत वाढ होत आहे. एकदिवसा आढ महिला अत्याचाराच्या घटना समोर येत असतात. महाराष्ट्र नाही तर राज्यातील अनेक भागात या घटना घडत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण घटना जगभरात पसरल्या जातात. सध्या अशीच एक घटना नवी मुंबईतील ऐरोलीमधऊन समोर आली आहे. ज्यात महिलेने छेड काढणाऱ्या तरुणाला चांगलेच बडवले आहे. सोशल मीडियावर ऐरोलीमधील हा प्रकाराचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल (Viral)होत असलेला व्हिडिओ नवी मुंबई जवळील ऐरोली सेक्टर 9 मार्केटमधील आहे. मार्केट (market)परिसरात एक महिला रोजच्या कामकाजाचे सामान खरेदी(Purchase) करण्यासाठी आलेली होती. त्या दरम्यान मार्केट परिसरात असलेल्या एका तरुणाने त्या महिलेची टिंगल टवाळी करत छेड काढली. मात्र संतापलेल्या महिलेने हातातील छत्रीने जागच्या जागी तरुणाला बडवले आहे. यावेळी परिसरातील असलेल्या नागरिकांनीही महिलेसकट त्या तरुणाला चांगलाचा चोप दिलेला आहे. या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण नियंत्रणात आणले.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, एक महिला एका तरुणाला मारताना दिसत आहे. जो तरुण जमिनीवर बसलेला दिसून येत आहे. जर तुम्ही नीट पाहिले तर महिला अत्यंत संतापलेली दिसून येत आहे. महिलेसह त्या परिसरात अनेक नागरिक तिथे जमलेले आहे. जे महिलेचा रूद्र अवतार पाहून अचंबित झालेले आहेत. संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ऐरोलीमधील हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील ''@SAAMTV'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांच्या पसंतील आलेला आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका नेटकऱ्याने लिहिले आहे की,'शब्बास' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''असंच केलं पाहिजे'' तर व्हिडिओ पाहिलेल्या प्रत्येक नेटकऱ्यांनी महिलेच्या धाडसाचे कौतुक केलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs BAN: चेन्नई कसोटी जिंकताच BCCI ची मोठी घोषणा! दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर

Maharashtra News Live Updates : माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात उमेदवारीचा तिढा कायम

Assembly Election: वडगावशेरीवर तिन्ही पक्षांचा दावा; राष्ट्रवादीच्या वादात आता शिवसेनेची उडी

Dombivali Crime : धक्कादायक..अंगावर गाडी घालत तरुणाला नेले फरफटत; खासगी जागेत उभा राहिल्याने वाद

Vande Bharat Train : राज्याला मिळाल्या ३ वंदे भारत एक्स्प्रेस; कोणत्या मार्गांवर धावतात, तिकिट किती? वेळापत्रक काय?

SCROLL FOR NEXT