Aishwarya Narkar Dance Saam Tv
व्हायरल न्यूज

Aishwarya Narkar Dance: 'तुझी कंबर एक नंबर चाल...' शेकी-शेकी... गाण्यावर ऐश्वर्या नारकरने धरला ठेका, VIDEO पाहा

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हिला देखील 'शेकी शेकी' गाण्याची भुरळ पडली आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्याने गाण्यावर डान्स करत व्हिडीओ शेअर केला आहे

Manasvi Choudhary

सोशल मिडिया हे असं माध्यम आहे जेथे तुम्ही केलेलं एक कृत्य लगेच व्हायरल होतं. अनेक व्हिडीओ रिल्सच्या माध्यमातून व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर 'शेकी शेकी' हे गाणं धुमाकूळ घालत आहे. या गाण्यातील लिरिक्सच्या तालावर अनेकजण व्हिडीओ बनवत आहेत. अशातच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हिला देखील 'शेकी शेकी' गाण्याची भुरळ पडली आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्याने गाण्यावर डान्स करत व्हिडीओ शेअर केला आहे जो सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर तिच्या सौंदर्यामुळेच नाही तर, डान्स आणि हावभाव यामुळे चर्चेत असते. ट्रेन्डिंग गाण्यावरील तिचे रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता ऐश्वर्याने 'शेकी शेकी' गाण्यावर ठेका धरला आहे. तुम्ही पाहू शकता, 'एक नंबर, तुझी कंबर चाल शेकी शेकी है...' या गाण्यातील लिरिक्सवर ऐश्वर्याने परफेक्ट अश्या हुकस्टेप्स केल्या आहेत. पांढऱ्या रंगाची साडीवर मॅचिंग निळा ब्लाऊज ऐश्वर्याने परिधान केला आहे.

ऐश्वर्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओ चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आतापर्यत या ९० हजारांपेक्षा अधिक व्हिडीओला पाहिले आहे. सोशल मीडियावर सतत काहीतरी हटके आणि आकर्षक स्वरूपातून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ऐश्वर्या नारकर यांना कधी चांगले तर कधी ट्रोल देखील केले जाते असे असतानाही मात्र ऐश्वर्या नारकर तरीही नृत्यावरील त्याचं प्रेम कमी झालेलं दिसत नाही त्या कायमच डान्स व्हिडीओ शेअर करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Jobs: महाराष्ट्रात लवकरच सरकारी नोकरीची मेगाभरती, फडणवीसांची घोषणा | VIDEO

Maharashtra Live News Update : महाराष्ट्रात मराठी माणसांची मुस्कटदबी सुरू, मनसे कार्यकर्त्यांचा संताप

Weight Loss Tea : नेहमीचा चहा करताना घाला या ३ गोष्टी फक्कड होईल चहा पोटही होईल कमी

रील्ससाठी छतावर चढली महिला अन् पाय घसरून पडली; धक्कादायक घटना मोबाईलमध्ये कैद

Karjat Station Accident : पती दिसला नाही म्हणून महिलेने धावत्या ट्रेनमधून मारली उडी; रेल्वे पोलिसांनी वाचवले प्राण

SCROLL FOR NEXT