Goregaon Fight CCTV: सोसायटीत पार्किंगचा वाद चिघळला; लिफ्टमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी ; व्हिडिओ समोर

Fighting Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडिओत हाणामारीच्या भयानक अशा घटना असतात. त्यातच नुकतच गोरेगाव येथील अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Fighting Viral Video
Goregaon Fight CCTVSaam Tv
Published On

Goregaon Shocking News: शहरात जागेअभावी पार्किंगच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत. त्यातच एका पार्किंगच्या वादाने थेट लिफ्टमध्येच हिंसक वळण घेतलं आणि दोन्ही गटांत जोरदार हाणामारी झाली. ही धक्कादायक घटना गोरेगाव पश्चिममधील एका नामांकित सोसायटीत घडली असून, संपूर्ण प्रकार सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

काय घडलं नेमकं?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील एका सोसायटीच्या लिफ्टमध्ये मारहाणीची घटना समोर आली आहे. सुरुवातीस बेकायदेशीर पार्किंगवरून दोन रहिवाशांमध्ये सुरुवातीला वाद झाला. वाद इतका टोकाला गेला की, ते दोघे लिफ्टमध्येच भिडले. काही क्षणांतच हा वाद हाणामारीत(Fighting) रुपांतरित झाला. लिफ्टमध्ये एकमेकांना ढकलणे, मारहाण करणे आणि शिवीगाळ करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.

लिफ्टमध्ये झालेल्या हाणामारीनंतरही प्रकार तिथेच थांबला नाही. त्यानंतर गोंधळ झाल्याने इतर रहिवासी आणि सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करत प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही गटांनी बाहेर येताच सोसायटीच्या गेटजवळ पुन्हा एकदा वाद उफाळला आणि मोठ्या प्रमाणावर धक्काबुक्की आणि मारहाण झाली.

सध्या हा व्हिडिओ(Video) वाऱ्याच्या वेगाने मुंबईसह अन्य शहरात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी संताप केला आहे तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला काही मिनिटांतच हजारो व्ह्यूज मिळालेले असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला इन्स्टाग्राम, फेसबूक, एक्स( ट्वीटर) अशा माध्यमांवर शेअर केलेला आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Fighting Viral Video
Viral Video: आधार कार्ड अपडेटला भली मोठी रांग, उभं राहण्यावरून महिलांची हाणामारी,नांदेडच्या पोस्ट ऑफिसमध्ये राडा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com