Pani Puri Saam TV
व्हायरल न्यूज

Pani Puri Viral Video: टेस्टी पाणीपुरीसाठी अॅसिडची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? जाणून घ्या

Mayuresh Kadav

पाणीपुरी, नुसतं नाव जरी घेतलं तरी तोंडाला पाणी येतं. पाणीपुरी खायला आवडत नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. अनेकजण आठवड्यातून एकदा तरी पाणीपुरीवर ताव मारतातच..लज्जतदार, काहीशी झटका देणारी, मात्र तितकीच गोड पाणीपुरी प्रत्येकालाच खावीशी वाटते. पाणीपुरीच्या चवीचं खरं गुपीत आहे ते स्वादिष्ट पाण्यात..पुदिना आणि तिखट-गोड पदार्थ मिक्स करून हे पाणी तयार केलं जातं.

मात्र याच पाण्यावर शंका उपस्थित करणारा एक मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. त्यात पाणीपुरीतल्या पाण्याला चव येण्यासाठी घातक पदार्थ मिसळले जात असल्याचा दावा करण्यात आलाय. व्हायरल मेसेजमध्ये नेमकं काय म्हंटलंय, ते जाणून घेऊ..

व्हायरल मेसेज

पाणीपुरीसाठी जे पाणी वापरलं जातं त्याला चव येण्यासाठी मिठाचं अॅसिड वापरलं जातं. हा विषारी पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. काही दुकानदार आपल्या फायद्यासाठी पाणीपुरीच्या पाण्यात भेसळ करत आहेत. हे अॅसिड बाजारात सहजपणे उपलब्ध होतं.

आपण सगळेच जण पाणीपुरी खातो. चायनीज पदार्थांना चव येण्यासाठी अजिनोमोटोचा वापर केला जातो हे आपल्याला चांगलंच ठाऊक आहे. मात्र पाणीपुरीतही अशा काही पदार्थांची भेसळ केली जाते का? असं कोणतं विषारी मीठ आहे जे पाणीपुरीला चविष्ट बनवतं. आम्ही यामागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. तज्ज्ञांकडून याबाबत माहिती घेतली. तेव्हा बऱ्याच बाबी समोर आल्या.

व्हायरल सत्य

पाणीपुरीच्या पाण्याला टेस्ट येण्यासाठी त्यात मिठाचं अॅसिड टाकलं जातं. 50 लीटर पाण्यात 400 ग्रॅम अॅसिडची भेसळ केली जाते. ग्राहकांना शंका येऊ नये म्हणून चिंच आणि आमचूरचं प्रमाणही जास्त ठेवलं जातं. हे अॅसिड स्लो पॉयझनप्रमाणे काम करतं. त्याचा तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. जळजळ, पोटाचे विकार होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही खात असलेल्या पाणीपुरीत भेसळ तर नाही ना? याची खातरजमा करून घेणं आवश्यक आहे.

पाणीपुरीतील भेसळ कशी ओळखाल?

ज्या भांड्यात पाणीपुरीचं पाणी ठेवलेलं असेल ते पाणी बारकाईनं बघा. भांड्याच्या रंगाची झीज झाली असेल तर त्यात भेसळ असू शकते. स्टीलच्या प्लेटमध्ये पाणी घेतल्यानंतर ती चमकदार नसेल तर पाण्यात ऍसिड असू शकतं. याशिवाय पाणीपुरी खाताना दातांवर एक थर जमा होत असेल तर ते पाणी भेसळयुक्त असू शकतं.

त्यामुळे पाणीपुरीच्या पाण्यात मिठाचं अॅासिड मिसळलं जात असल्याचा दावा सत्य ठरलाय. अर्थात सगळेच पाणीपुरी विक्रेते अशी भेसळ करतात असं नाही. याचं प्रमाण अत्यल्प स्वरूपातही असू शकतं. मात्र तरीही आरोग्याच्या बाबतीत तुम्हीही सजग राहणं आवश्यक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय, मराठवाडा-विदर्भात जोरदार पाऊस होणार; या जिल्ह्यांना अलर्ट

Rashi Bhavishya today : मनातील भावना जोडीदाराला शेअर कराल; तुमची रास यात आहे का?

Horoscope Today : भाग्य फळफळणारा आजचा दिवस, मामाच्या संमिश्र गोष्टी कानावर येतील; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

SCROLL FOR NEXT