Viral Video saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: ब्राझीलच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडला विचित्र मासा, दात पाहून लोकांना बसला धक्का, पाहा व्हायरल VIDEO

Viral Video On Brazil: सध्या एका अनोख्या माशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. हा मासा इतका वेगळा आहे की तुम्ही याआधी असं काही पाहिलं नसेल.

Dhanshri Shintre

सोशल मीडियावर असे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात, जे पाहिल्यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. कधी विचित्र प्राणी, कधी अप्रतिम निसर्गदृश्ये आपलं लक्ष वेधून घेतात. सध्या एका अनोख्या माशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. हा मासा इतका वेगळा आहे की तुम्ही याआधी असं काही पाहिलं नसेल.

ब्राझीलमध्ये राहणाऱ्या पाउला मोरेरा या महिलेच्या हाती हा मासा लागला. या माशाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या तोंडाला माणसासारखे दात आहेत. पाउला जेव्हा या माशाला पाहते, तेव्हा ती आश्चर्यचकित होते. तिने तात्काळ त्याचा व्हिडिओ तयार करून इंटरनेटवर शेअर केला. व्हिडिओ पाहून लोकांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत, आणि या माशाविषयीची माहिती मिळवण्यासाठी अनेकांनी शोध सुरू केला आहे.

या विचित्र माशाने युजर्समध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. त्याचे अनोखे स्वरूप पाहून अनेक जण त्याचं नाव, प्रकार आणि वैशिष्ट्यांवर चर्चा करत आहेत. व्हिडिओला लाखोंनी व्ह्यूज मिळाले असून, लोकांना हा मासा पाहण्याचा अनुभव अद्भुत वाटत आहे. विचित्र जीवसृष्टीची ओळख करून देणारा हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच चर्चेत आहे.

सामान्यतः बाजारात विकल्या जाणाऱ्या माशांमध्ये असे दात दिसत नाहीत, पण सध्या सोशल मीडियावर एका अनोख्या माशाचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. या माशाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे दात माणसाच्या दातांप्रमाणे दिसतात, ज्यामुळे अनेक युजर्स त्यावर कमेंट्स करून आश्चर्य व्यक्त करत आहेत. काहींनी मजेत या दातांची मागणीही केली आहे, जणू ते माणसाच्या तोंडात बसवण्यासाठी योग्य असतील. व्हिडिओमध्ये एक महिला या माशाच्या तोंडातील दात दाखवताना दिसते. तिच्या कुटुंबाने ३० डिसेंबर रोजी समुद्रकिनाऱ्याजवळ फिरताना हा मासा विकत घेतला. त्यांच्या आजीसोबतच्या सहलीदरम्यान त्यांना असे तीन मासे मिळाले, त्यापैकी एक मासा इतका वेगळा निघाला की, त्याचा व्हिडिओ लगेच व्हायरल झाला.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @paulamoreiraor नावाच्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "इसिसच्या पोर्टो वेल्हो बीचवर अँटेना सापडला. हा कोणत्या प्रकारचा मासा आहे, हे कोणाला माहीत आहे का?" या व्हिडिओला आतापर्यंत लाखोंहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, ६० हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. विचित्र माशाच्या व्हिडिओवर यूजर्स भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने त्याचे वर्णन करताना लिहिले, "हा टूथपिक मासा आहे, ज्याला आर्कोसर्गस प्रोटिओसेफलस म्हणतात." दुसऱ्याने मजेत लिहिले, "त्याचे दात माझ्यापेक्षा चांगले आहेत." या अनोख्या माशाच्या माणसासारख्या दातांनी लोकांना थक्क केले असून, व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika - Vijay: रश्मिका आणि विजय देवरकोंडाने गुपचूप केलं लग्न? जाणून घ्या व्हायरल फोटोंमागील सत्य

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये २०८ संशयित बोगस मतदार ताब्यात; पोलीस चौकशी सुरू

Christmas Plum Cake : ख्रिसमससाठी बनवा ड्रायफ्रुट्सने भरलेला प्लम केक, वाचा सोपी रेसिपी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, खात्यात खटाखट जमा होणार ₹3000; तारीख आली समोर

Winter Skin Health : हिवाळ्यात त्वचा काचेसारखी चमकेल, दररोज 'या' 5 पैकी कोणताही एक पदार्थ खा

SCROLL FOR NEXT