Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मेरा साँस नही चल रहा है... अभ्यास न करण्यासाठी चिमुकल्याने लढवली अनोखी शक्कल; VIDEO VIRAL

Viral News : एका लहान मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

A Boy Give Strange Reason For Not Studying Video Viral

लहान मुलं ही खूप जास्त खोडकर आणि अतरंगी असतात. नेहमी काही न काही करतच असतात. लहान मुलांना अभ्यासापेक्षा खेळण्यात जास्त रस असतो. त्यांना अभ्यास करायचा नसतो. त्यासाठी ते वेगवेगळी कारणं शोधत असतात.पण एका चिमुकल्याने अभ्यास न करण्यासाठी चक्क मला श्वास घेता येत नाही असेच कारण दिले आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. लहान मुल जेवढी क्युट असतात तेवढीच खोडकर असतात. ते कधी काय करतील किंवा काय बोलतील याचा भरवसा नसतो. असाच एका मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

@itsmetarunshukla या सोशल मीडिया अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत मुलगा अभ्यास करताना दिसत आहे. त्याच्या डोळ्यातून अश्रुंच्या धारा लागल्या आहेत. त्याच्या रडण्यामागचे कारण म्हणजे या मुलाला अभ्यास करायचा नाहीये. त्याला अभ्यास करायचा नसूनही त्याची आई त्याला अभ्यास करण्यास सांगत आहे.

या व्हिडिओत चिमुकल्याने अभ्यास न करण्यासाठी एक वेगळंच कारण सांगितलं आहे. मुलाला अभ्यास करण्यास सांगितल्यावर तो म्हणतोय की, मला श्वास घ्यायला त्रास होतोय. त्यावर त्याची आई म्हणते, तुला फक्त अभ्यास करतानाच हा त्रास होतो काय? त्यावर तो म्हणतो, खेळतानाही हा त्रास होतो. त्याची आई त्याला खूप ओरडताना दिसत आहे. तो मुलगा आईला म्हणतो, तु माझ्यावर प्रेमच करत नाही. त्यांचा हा संवाद खूपच मजेशीर आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लहान मुले कधी काय बोलतील हे सांगता येणार नाही. याचे हा व्हिडिओ उत्तम उदाहरण आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्की पोट दुखेपर्यंत हसाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सरकार नेहमी राजकीय खेळ करते - प्रियंका गांधी

आम्ही चर्चेसाठी तयार...; विरोधक धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम, लोकसभेत मोठा गोंधळ|VIDEO

Breathing Problems : नाक बंद झालय? श्वास घ्यायला त्रास होतोय? तर घरच्या घरी करा 'हे' सोपे उपाय

Auto Tips : बाईक कमी मायलेज देतेय? 'हे' ५ बदल केल्याने होईल पेट्रोलची बचत

Blood Pressure : बीट की डाळिंब? BP नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणता ज्यूस फायदेशीर

SCROLL FOR NEXT