Mumbai Viral Video: मुंबईत मराठी भाषिकांना जागा नाकारली! संतापजनक व्हिडीओ आला समोर

Gujrati Viral Video: मुंबईत मराठी भाषिकांना जागा नाकारली! संतापजनक व्हिडीओ आला समोर
Gujrati Viral Video
Gujrati Viral Video Saam Tv
Published On

>> प्रसाद जगताप

Mumbai Viral Video:

मुंबईत एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. 'यहा महाराष्ट्रीयन को जगह नही मिलेंगी, जो करना है वो करलो', असं म्हणत मराठी जोडप्याला गुजराती सोसायटीत ऑफिस नाकारल्याचे घटना घडली आहे. या सोसायटीतील लोकांनी त्यांचा मोबाईल हिसकावला, त्यांच्याशी धक्काबुक्कीही केली.

विशेष म्हणजे हा सगळा प्रकार महाराष्ट्राच्या बाहेर नाही. तर आपल्याच राज्याची राजधानी मुंबईत घडलाय. अगदी काही तासात विरोध करणाऱ्या या गुजरातींचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कान टोचलेत. त्यांनी माफी सुद्धा मागितलीये. याच घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Gujrati Viral Video
Excessive Noise Effects: मिरवणूक, DJ, डान्स आणि मृत्यू! आवाजाच्या अधिक गोंगाटामुळे खरंच मृत्यू होतो का?

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत दिसणाऱ्या महिलेचं नाव तृप्ती देवरुखकर आहे. देवरुखकर दांम्पत्य आपल्या ऑफिससाठी जागेच्या शोधात होतं. अशातच त्यांना जागेचा ऑनलाईन पत्ता मिळाला. ती जागा मुंबईच्या मुलुंड वेस्ट मधील शिवसदन इमारतीत होती. ती पाहण्यासाठी गेल्यावर तिथं हा भयंकर प्रकार घडलाय. (Latest Marathi News)

तृप्तीने हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये शूट करण्याचा प्रयत्न केला. पण तिचा मोबाईल हिसकावून घेण्यात आला. तृप्ती आणि तिच्या नवऱ्याला धक्काबुक्की झाल्याचाही तृप्तीचा आरोप आहे. नंतर हा सगळा प्रकार मनसे पदाधिकाऱ्यांच्या कानावर पडला. त्यांनी यात मध्यस्थी केली.

Gujrati Viral Video
Nanded Crime News: धक्कादायक! गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला, नांदेडमध्ये भर वस्तीत घडला थरार

दरम्यान, भाषा पाहून जागा भाड्याने देणाऱ्या लोकांच्या मानसिकतेला काय म्हणावं? महाराष्ट्रात जर मराठी भाषीकांची ही अवाहेलना होत असेल. तर मराठी भाषीकांनी जावं तरी कुठं? असेही प्रश्न आता या घटनेवरून विचारले जातायेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com