डान्स म्हणजे अनेकांचा आवडता छंद. डिजेवर गाणं वाजलं तरी लगेच पाय थिरकायला लागतात. सोशल मीडियावर देखील अनेक डान्सचे अनेक रिल्स व्हायरल होतात. सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत. पावसाळ्यात धबधबे, डोंगरदऱ्यांना पर्यटक भेट देतात. सोशल मीडियावर देखील याचे रिल्स व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या असाच एक आजोबांचा जबरदस्त डान्स करणारा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे.
वयोवृद्ध पण अंगात उत्साह भरलेला आजोबांचा डान्स सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. डोंगराच्या कुशीतून खळखळ वाहणाऱ्या धबधब्यासमोर एका आजोबांनी अक्षरशः तरुणाईलाही लाजवेल असा भन्नाट डान्स केलाय लपकझपक स्टेप्स, आत्मविश्वास आणि निसर्गाच्या तालावर थिरकणारी ही अदाकारी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. वय हा केवळ एक आकडा आहे, हे आजोबांनी त्यांच्या हटके स्टाईलने दाखवून दिलं आहे
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आजोबांनी अत्यंत अप्रतिम असा डान्स केला आहे. धबाधब्यासमोर आजोबांनी खास पारंपारिक वेशात डोक्यावर टोपी आणि धोतर असा पोशाख परिधान केला आहे. सोशल मीडियावर आजोबांचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.सोशल मीडियावर आजोबांच्या या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव होतो आहे. नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.