Viral Gym Incident Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Gym Incident: व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका; जिममध्येच कोसळला व्यक्ती; धक्कादायक व्हिडिओ समोर

Shocking Viral Video: गेल्या वर्षात हृदयविकाराच्या झटक्यामुळे अनेक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर सध्या या संबंधित एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे. ज्यात एका व्यक्तीचा जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू झालेला आहे.

Tanvi Pol

Gorakhpur Video News: एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. ज्यात हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ५२ वर्षीय व्यक्तीचा जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना जिममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातमध्ये कैद झाली असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये (Video) स्पष्टपणे दिसतं की, तो व्यक्ती जिममध्ये व्यायाम करत असतो. अचानक तो जिमच्या दुसरीकडे व्यायाम करण्यासाठी जात असतो. मात्र, अचानक तो खाली कोसळतो. त्याला पाहून जिम ट्रेनर त्याला उचलण्यासाठी जातो आणि जिममधील अन्य सदस्याही तिथे जातात.

पहिल्यांदा सर्वांना चक्कर येण्याचा प्रकार वाटतो. परंतु, काही सेकंदात सर्वांच्या लक्षात आलं त्या व्यक्तीला श्वास घेता येत नाही. त्यातील एकाने रुग्णवाहिका बोलावली. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. सर्व घटना पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

घडलेला हा प्रकार जबलपूरमधील गोरखपूरचा आहे. या घटनेचा व्हिडिओ(Video) सोशल मीडियावरील @Sports_Kuldeep या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. आतापर्यंत ही घटना पाहून लोकांनी विविध प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''सध्या असे प्रकार खुप समोर येत आहेत'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''आरोग्याकडे नीट लक्ष द्यावे प्रत्येकाने'' शिवाय काहींनी भावनिक प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत.

टीप: जिममधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Hans Mahapurush Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु वक्री होऊन बनवणार हंस महापुरुष राजयोग, 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! नोकरी करत केली UPSC क्रॅक; IAS नेहा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Gaza News Today : गाझात उपासमारीने 124 जणांचा मृत्यू; 50 ग्रॅमचं बिस्किट 750 रुपयांना, VIDEO

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT