River Cleaning : ना मोठी टीम, ना सरकारी मदत... २० वर्षाच्या एकट्या पोराने नदी केली स्वच्छ, Video Viral  META AI
व्हायरल न्यूज

Video Viral : ना मोठी टीम, ना सरकारी मदत... २० वर्षाच्या एकट्या पोराने नदी केली स्वच्छ

Viral News river cleaning : मध्य प्रदेशातील तरूणाने महिन्याभरात अजनार नदी स्वच्छ केली. २० वर्षापासून नदीत साचलेला गाळ या तरूणाने एकट्याने स्वच्छ केला आणि गटाराचे रुपांतर नदीत झाले. सध्या हा तरूण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Saam Tv

जलप्रदुषण हा काळाला भेडसावणारा गंभीर विषय आहे. भारतातल्या बऱ्याचशा नद्या या जलप्रदुषणाच्या विळख्यात बुजल्या आहेत. कारखान्यांचे दूषित पाणी नदीत सोडले जातं आणि स्वच्छ सुंदर नदीचे रूपांतर नाल्यात - गटारात होतं. मध्य प्रदेशातील अवघ्या २० वर्षाच्या सुरेंद्र सिंह चौधरी या तरूणाने अवघ्या महिन्याभरात नदी स्वच्छ केली आहे. सध्या या तरूणाचे काम सोशल मीडियावर व्हायरल होत असून देशभरातून त्याच्या कामाचे कौतुक होत आहे.

हा तरूण जिथे राहतो त्या ठिकाणाहून अजनार नदी वाहते. गेली २० वर्षे ही नदी जलप्रदुषणाच्या विळख्यात अडकली होती. या तरूणाने स्वत:नदी साफ करण्याची जबाबदारी उचलत अवघ्या महिन्याभरात नदी स्वच्छ केली आहे. विशेष म्हणजे ही मोहीम कोणत्याही संस्थेचा किंवा उपक्रमाचा भाग नव्हती. स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करत तरूणाने ही नदी स्वच्छ केली आहे.

बिफोर आफ्टर ची पोस्ट

सुरेंद्रने इंन्टाग्रामवर नदी स्वच्छतेपूर्वीचा फोटो आणि नंतरचे फोटो शेअर केले आहेत. बिफोरमध्ये घाणेरडी कचऱ्याने भरलेली नदी आणि दुसऱ्या फोटोमध्ये खळखळून वाहणारी नदी. फोटो इतका बोलका आहे की याला कॅप्शनचीही गरज नाही. नदी स्वच्छतेची मोहिम हाती घेताना बऱ्याच लोकांनी त्याच्यावर टिका केली. बहुतेक लोकांनी त्याला वेडयात काढले गावकऱ्यांनी त्याला थांबवण्याचे अनेक प्रयत्न केले. पण तो थांबला नाही. हळू हळू करत संपूर्ण नदीतला गाळ काढला. त्याच्या याच कामाचे आज अख्ख जगं कौतुक करत आहेत. महिंद्रा कंपनीचे आनंद महिंद्रा यांनी देखील कमेंट करत नदी स्वच्छतेच्या मोहिमेत त्याला पाठिंबा दिला होता. अशा लोकांच्या सपोर्टमुळे काम करण्याच बळ मिळतं असं सुरेंद्र याने म्हटले आहे.

सुरेंद्र सिंह चौधरी या मुलाचे सोशल मिडियावर बिट्टू तबाही या नावाने अकाऊंट आहे. त्याचे २.९६ लाख इतके फॉलोवर्स आहेत. सुरेंद्र हा पर्यावरण रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी झटणारा पर्यावरणवादी आहे. याआधीची पर्यावरणाच्या संवर्धनासंबंधित अनेक कामे त्याच्या सोशल मीडियावर त्याने पोस्ट केली आहेत.

नेटकऱ्यांकडून कौतुक

या सगळ्याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर अपलोड केला आहे. देशभरातून या तरूणावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेक मोठ्या लोकांनी त्याच्या या कामाची दखल घेत त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. या नद्या स्वच्छ करण्यासाठी शासनाच्यावतीने अनेक उपक्रम राबवले जातात. अमाप पैसा खर्च केला जातो. पण परिस्थिती जैसे थे पाहायला मिळते. मोठ -मोठ्या लोकांना जे जमलं नाही, नेत्यांना जमलं असं काम एका २० वर्षाच्या पोराने एका महिन्यात करून दाखवलंय.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! शिपायापासून सचिवांपर्यंत किती असेल पगार?

Bathroom mirror cleaning: आरशावरचे हट्टी डाग कसे काढाल? या 5 टीप्सने होईल आरसा होईल चकचकीत

Maharashtra Politics: शिवसेनेत खलबतं! एकनाथ शिंदे मंत्र्यांवर नाराज, तातडीची बैठक बोलावत दिली तंबी

Gold Rate Today : दसऱ्याआधी सोनं स्वस्त झालं की महागले? २४, २२, १८ कॅरेटचे ताजे दर आले समोर

SCROLL FOR NEXT