Fact Check: सरकारी कर्मचाऱ्यांना रील बघण्यास बंदी? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Government Employees Banned From Watching Reels: आता सरकारी कर्मचाऱ्यांना रील्स पाहणं, आणि बनवण्यावर बंदी आणण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय, केंद्र सरकारने असा निर्णय घेतल्याचा दावा केल्यानं खळबळ उडालीय पण, या दाव्यात तथ्य आहे का? याची आम्ही पडताळणी केली, त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.
Government Employees Banned From Watching Reels
FACT CHECK: GOVERNMENT EMPLOYEES REELS BAN? HERE’S THE TRUTH BEHIND THE VIRAL CLAIMsaam tv
Published On
Summary
  • सरकारी कर्मचाऱ्यांना रील्स पाहण्यावर देशव्यापी बंदी

  • केंद्र सरकार सरकारी अधिकाऱ्यांसाठी सोशल मीडिया आचारसंहिता आणण्याचा विचार

  • “रील पाहण्यावर बंदी लागू झाली” असा अधिकृत अंतिम आदेश सध्या उपलब्ध नाही.

देशभरातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आता कामाच्यावेळी रिल्स पाहणं आणि बनवण्यावर बंदी घालण्यात आलीय.जर कामाच्या वेळी रिल्स पाहत बसाल तर कारवाई होऊ शकते असा दावा करण्यात आलाय...केंद्र सरकारने असा मोठा निर्णय घेतल्याचा दावा केल्याने एकच खळबळ उडालीय.कारण, देशभरात कोट्यवधी सरकारी कर्मचारी आहेत.असा निर्णय झाला असेल तर कर्मचाऱ्यांना कामाच्यावेळी मोबाईल पाहणंच अवघड होणार आहे. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज

सरकारी कार्यालयात काम करताना कर्मचाऱ्यांनी रील्स पाहिले, आणि रील्स तयार करून सोशल मीडियावर अपलोड केले तर कारवाई होणार. आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ऑफिसमध्ये रील बघणे आणि बनवण्यावर पूर्णपणे बंदी घातलीय. हा मेसेज व्हायरल झाल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली.याबाबत खरंच सरकारने असा निर्णय घेतलाय का? याची आम्ही पडताळणी करण्यासाठी अनेक वेबसाईट पाहिल्या.तसंच सरकारने असा कोणता निर्णय़ घेतलाय का हे तपासून पाहिलं.मात्र, याबाबत असा कोणताही जीआर आम्हाला सापडला नाही.त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

Government Employees Banned From Watching Reels
Fact Check: नेपाळच्या पुरामध्ये 4 हजार कोटी वर्षे जुना शाळीग्राम सापडला? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

साम इन्व्हिस्टिगेशन

सरकारी कर्मचाऱ्यांनी रील बघू नये असा GR नाही

कर्मचाऱ्यांना रील बघण्यावर सरसकट बंदी घातलेली नाही

केंद्र सरकारनेही असा कोणता निर्णय घेतलेला नाही

कामाच्या वेळी रील पाहणे, व्हिडिओ पाहण्यावर निर्बंध

Government Employees Banned From Watching Reels
Fact-Check: रक्षाबंधनाला शेतकऱ्यांना 4 हजार रूपये? केंद्र सरकार शेतकऱ्यांना वाढीव 2 हजार देणार?

केंद्र सरकार लवकरच आपल्या अधिकाऱ्यांसाठी 'सोशल मीडिया आचारसंहिता' लागू करू शकतं.असा विचार सुरू असल्याची माहिती मिळतेय मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांना रिल्स पाहणं आणि बनवण्यावर बंदी घातल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय.पण, कामाच्यावेळी मोबाईल पाहण्याबाबत काही निर्बंध आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com