Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : डाळीला फोडणी द्यायला गेला आणि टोपालाच आग लागली; थरारक VIDEO व्हायरल

Dal Tadka Viral Video : जरा जरी चूक झाली की पदार्थ बिघडतो आणि आगीशी खेळ केला की अनर्थ घडतो. अशाच काहीसा प्रकार 2 मुलांसोबत घडला आहे. डाळीला फोडणी देताना टोपाला थेट आग लागलीय.

Ruchika Jadhav

Viral Video :

आजकाल कामानिमित्त अनेक तरुण तरुणी घराबाहेर पडतात. नोकरीच्या शोधात घरापासून लांब मुंबई पुण्यात येऊन राहतात. आता मुली-मुली राहत असतील तर जेवणाची तितकीशी गैरसोय होत नाही. मात्र मुलं-मुलं एकत्र रूम करून राहत असतील तर जेवणात त्यांची मोठी गैरसोय होते.

मुलांना जेवण बनवता येत नाही. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी सर्वजण मिळून काही ना काही बनवतात आणि आपली भूक भागवतात. पण जेवण बनवणे साधीसोप्पी गोष्ट नाही. जरा जरी चूक झाली की पदार्थ बिघडतो आणि आगीशी खेळ केला की अनर्थ घडतो. असाच काहीसा प्रकार 2 मुलांसोबत घडला आहे. डाळीला फोडणी देताना टोपाला थेट आग लागलीय.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण गॅस जवळ बसले आहेत. भूक लागल्याने त्यांनी आधी डाळ शिजवून घेतलीये. आता फक्त शिजवलेली डाळ खाणे त्यांना पसंत नाही. त्यामुळे त्यांनी याला थोडी फोडणी द्यायचं ठरवलं. फोडणीसाठी एक भांडं घेतलं. त्यात तेल, जिरे, मोहरी, कडीपत्ता, मिरची सर्व काही टाकलं. त्यानंतर ही फोडणी गरम झाल्यावर त्यांनी ती शिजवलेल्या डाळीत ओतली. मात्र असं करताना त्यांनी नीट काळजी घेतली नाही.

फोडणीचा चमचा त्यांनी थेट शिजवलेल्या डाळीच्या टोपात टाकला आणि पटकन टोपावर झाकण ठेवलं. तसेच फोडणी देताना त्यांनी यात एक चारकोलचा आग लावलेला तुकडा देखील ठेवला होता. आग लागलेला चारकोल टोपात जाताच आगीचा भडका उडाला आणि फोडणी सकट टोपाला आग लागली. सुदैवाने आगीने जास्त पेट घेतला नाही. आपण जे काही केलंय ते भयंकरच आहे हे या तरुणांना समजलं आणि ते तेथून पळून गेले.

या दोन्ही तरुणांनी केलेल्या करामतीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. @rustam120012 या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी देखील यावर विविध कमेंट केल्यात. हे दोघं जेवण बनवत आहेत की एखादा जादूचा प्रयोग करत आहेत, कोण म्हणतं मुलांचं आयुष्य सोप्प आहे, अशा कमेंट देखील काहींनी केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepal Banned Social Media : नेपाळ नंतर 'या' देशात सोशल मीडियावर बंदी, जाणून घ्या

Mumbai Traffic Police Viral Video: हा अधिकार कुणी दिला ? पोलिसांनी पार्किंगमधल्या धाडधाड गाड्या पाडल्या, व्हिडिओ पाहून राग अनावर येईल

शेतकऱ्यांना दिलासा, वीज दरात सवलत; फडणवीस सरकारचे ४ मोठे निर्णय

Maharashtra Live News Update: जरांगेंनी सरकारला इशारा दिला, त्यावर भुजबळ काय म्हणाले?

Sakhi Gokhale: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लेकीने परदेशात घेतलंय शिक्षण; आज गाजवतेय इंडस्ट्री

SCROLL FOR NEXT