Student Dies Due To Silent Heart Attack Video Saamtv
व्हायरल न्यूज

Heart Attack Video: वर्गात बसल्या बसल्या कोसळला, १८ वर्षाच्या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू; थरारक VIDEO

Gangappa Pujari

Student Dies Due To Silent Heart Attack:

हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जिममध्ये व्यायाम करताना, चालता बोलता हृदयविकाराचा झटका आला अन् मृत्यू झाल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असतील. अशीच धक्कादायक घटना मध्यप्रदेशातून समोर आली आहे. मध्यप्रदेशच्या इंदोरमध्ये  एका १८ वर्षीय विद्यार्थ्याचा वर्गातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सागर जिल्ह्यात एका 18 वर्षीय विद्यार्थ्याचा कोचिंग क्लासदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. राजा लोधी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. बुधवारी (१७ जानेवारी) इंदूरमधील खासगी कोचिंग क्लासमध्ये शिकत असतानाच त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला.

राधा लोधी हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी कोचिंग क्लासमध्ये बसला असतानाच तो अचानक बेंचवर कोसळला. यानंतर त्याला त्याच्या मित्रांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोचिंग डायरेक्टर अश्विनी कुमार यांनी सांगितले की, 'सागरचा राहणारा 20 वर्षीय राजेश उर्फ ​​राजा लोधी, इंदूरमध्ये पीएससीची तयारी करत होता. बुधवारी सकाळी 8 ते दुपारी 1.30 या वेळेत हा क्लास सुरू होता. वर्गात एक वाजण्याच्या सुमारास राजाला हृदयविकाराचा झटका आला. यावेळी विद्यार्थ्यांनी सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. यानंतर लगेचच त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT