100 Snakes In 1 House Saam Tv
व्हायरल न्यूज

100 Snakes In 1 House: अबब! घराच्या कोपऱ्यात तब्बल १०० साप; पाहा हा भयावह व्हिडिओ

Snake Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान पाहिला जात आहे. जिथे एका घरात अनेक साप मिळालेले आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या अंगाचा थरकाप उडाला आहे.

Tanvi Pol

100 Snakes Video: उत्तर प्रदेशमधील एका गावात घडलेली ही घटना ऐकून तुमच्या अंगावर नक्कीच काटा येईल. एका गावकऱ्याच्या घरात एक-दोन नव्हे, तर तब्बल १०० हून अधिक साप सापडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सोशल मीडियावर या सापांचा व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे.

जलालाबादमधील एका गावात ही घटना समोर आली आहे. जिथे या गावात एक व्यक्ती घर स्वच्छ करत असताना त्यांना मोठ्या घरातील एका कोपऱ्यात एक ड्रम दिसला. त्यानंतर त्या व्यक्तीने तो ड्रम उचलण्याचा प्रयत्न केला पण तो त्यानंतर घाबरुन ओरडण्यास सुरुवात केली. जेव्हा घरातील सर्वजण तिथे जमले तेव्हा सर्वांना धक्का बसला.

याचे कारण म्हणजे त्यांना एक साप(Snake) बाहेर सरकताना दिसला. घरच्यांनी पुढे पाहिले तर ड्रमच्या बाजूला त्यांना जवळपास १०० साप एकमेंकाना गुंडाळलेले दिसून आले. घरच्यांनी घाबरुन लगेच गावकऱ्यांना मदतीसाठी बोलावले. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार सापांना पकडण्यासाठी सर्पमित्रांनी बोलावले आणि सर्पमित्रांनी येऊन ते साप घेऊन जवळच्या जंगलाच सोडून दिले.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ(Video) तुम्हाला एका प्लास्टिकच्या भांड्यात एक नाही तर तब्बल अनेक साप दिसून येत आहे. काही साप एकमेंकाना वेटोळ घालून बसलेले आहे. सध्या हा व्हिडिओ @bstvlive या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओतील दृश्य पाहून प्रत्येकजण घाबरुन गेलेला आहे.

टीप: सापाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Airtel: घरात वाय-फाय समस्या? फक्त ९९ रुपयांमध्ये घरभर हाय स्पीड इंटरनेट

Todays Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील; वाचा राशीभविष्य

Ganpati Visarjan 2025: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बनतोय दुर्मिळ संयोग; 'या' गोष्टी दान करणं मानलं जातं शुभ

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT