Dead body of youth missing from Yavatmal Medical College Hospital
Dead body of youth missing from Yavatmal Medical College Hospital 
viral-satya-news

मृतदेहच झाला गायब; नातेवाईकांची पोलिसांत तक्रार

प्रसाद नायगावकर

यवतमाळ : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात Medical College मंगळवारी दाखल झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह ४ दिवसांनंतरही त्याच्या नातेवाईकास मिळालेला नाही. रोशन भीमराव ढोकणेअसे मृत युवकाचे नाव आहे. त्याचा मृतदेह मेडिकलमधून बेपत्ता असल्याने नातेवाईक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे नातेवाईकांनी वैद्यकीय महाविद्यालयाविरुद्ध रोष व्यक्त करीत शहर पोलीस Police ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.Dead body of youth missing from Yavatmal Medical College Hospital

नेर तालुक्यातील रोशनला मंगळवारी सकाळी पोटदुखीच्या असह्य त्रासामुळे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दिवसभर फिवर ओपीडीत OPD ठेवण्यात आल्यानंतर सायंकाळी वॉर्ड क्र. २५ मध्ये हलविण्यात आले. वैद्यकीय उपचारादरम्यान  त्याचा मृत्यू झाला. रोशनच्या मृत्यनंतर संबंधित नातेवाईकांना तशी सूचना देण्यात आली . त्यानंतर मृतदेह घेण्याकरिता गेलेल्या कुटुंबियांना मृतदेह दिलाच गेला नाही . शवागार ते रुग्णालय येराझारा घालूनही रोशनचा मृतदेह गवसाला नाही .

वैद्यकीय महाविद्यालयात दररोज सरासरी २० ते ३० रुग्णांचा मृत्यू होत आहे. कोरोनाबाधितांचा मृतदेह नेताना कोण्या दुसऱ्याच्या नातेवाईकाने  रोशनचा मृतदेह Dead Body चुकीने नेण्यात येऊन त्याच्यावर अंत्यसंस्कारही झाले असण्याची शक्यता आहे. येथील शवविच्छेदनगृहात एका मध्यमवयीन अनोळखी पुरूषाचा मृतदेह दोन दिवसांपासून ठेवलेला आहे. त्याची ओळख अद्यापही पटली नाही. त्यामुळे कुणीतरी चुकून रोशनचा मृतदेह घेऊन गेले आणि हा मृतदेह तसाच राहिला असण्याची शक्यता आहे. या मृतदेहाची ओळख पटवून त्याच्या नातेवाईकांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे. बेपत्ता रोशनच्या  संदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाने उच्यस्थरीय समिती नेमली असून या बाबतीत शोध सुरु आहे असे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. मिलिंद कांबळे यांनी सांगितले.Dead body of youth missing from Yavatmal Medical College Hospital

सध्या कोरोनाची महामारी प्रचंड वाढली आहे . रुग्णांची संख्या प्रचंड वाढल्याने संबंधित वैद्याकीय कर्मचारी वर्गाचे  काम मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आधीच अत्यंत तोकड्या कर्मचाऱ्यांसोबत काम करीत असलेला कर्मचारी वर्ग अत्यंत दबावाखाली काम करीत आहे. यामुळे मानवी चूक होऊ शकते. आता तरी कोरोना काळात शासनाने वैद्यकीय क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याची गरज निर्माण झाली आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karnataka Crime : ६ वर्षांच्या पोटच्या पोरासाठी आईच बनली काळ; नवऱ्यासोबत भांडणानंतर मगरीच्या कळपात फेकलं

Today's Marathi News Live : कन्हैय्या कुमार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, उत्तर दिल्ली लोकसभा मतदारसंघातून रिंगणात

Special Report : बारामती लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला, Shriniwas Pawar यांचं अजितदादांना आव्हान

IPL Points Table Update: KKR नंबर १, CSK ची टॉप ४ मध्ये एन्ट्री! LSG चं टेन्शन वाढलं; पाहा लेटेस्ट पॉईंट्स टेबल

व्हिजन, मुद्दे नसल्यानेच विरोधकांकडून अपप्रचार सुरू : खासदार इम्तियाज जलील

SCROLL FOR NEXT