Zepto Saam TV
Video

Zepto : झेप्टोला हायकोर्टाचा दणका, तंबाखू युक्त पदार्थ ऑनलाइन विक्रीची घटना | VIDEO

Zepto in Trouble for Delivering Banned Products : झेप्टोला नागपूर हायकोर्टाचा दणका दिला आहे. तंबाखू युक्त पदार्थ झेप्टो ऑनलाइन विक्री केल्याने गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ऑनलाईन किराणा सेवा पुरवणाऱ्या झेप्टो (Zepto) कंपनीला नागपूर खंडपीठाने मोठा दणका दिला आहे. महाराष्ट्रात तंबाखूयुक्त पानमसाल्यावर बंदी असतानाही झेप्टोमार्फत हे पदार्थ ऑनलाइन विकले जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

या प्रकरणी नागपूरमधील रोहन जयस्वाल या नागरिकाने कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना हायकोर्टाने स्पष्टपणे निर्देश दिले की, झेप्टोने बंदी असलेल्या तंबाखूयुक्त पानमसाल्याची ऑनलाइन विक्री करून कायद्याचे उल्लंघन केलं आहे, त्यामुळे झेप्टो कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा.

कोर्टाने म्हटलं की, प्रतिबंधित पदार्थांची घरपोच सेवा देणं ही गंभीर बाब असून, सरकारच्या आदेशाला आणि सार्वजनिक आरोग्याच्या हिताला धोका पोहोचवणारा प्रकार आहे.दरम्यान, याप्रकरणी प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. झेप्टोसारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरून बंदी घालण्यात आलेले पदार्थ विकले जात असल्याची बाब उघड झाल्यानं, इतर कंपन्याही तपासाच्या रडारवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोस्टल रोड टनलमध्ये गाडीला आग; वाहतूक ठप्प

PM Kisan Yojana: दिवाळीआधी शेतकऱ्यांना खुशखबर मिळणार! या दिवशी पीएम किसानचा हप्ता जमा होण्याची शक्यता

IND vs PAK: एशिया कपमधील वाद काही संपेना; BCCI ने पाकच्या २ खेळाडूंची ICC कडे केली तक्रार

GST Reforms: जीएसटी कपाती, 'ही' कार बनली जगातील सर्वात बजेट फ्रेंडली कार, GST नंतर मोठी बचत

Solapur News : "सॉरी पब्लिक, मी खूप मोठा निर्णय घेतलाय..."; प्रसिद्ध रीलस्टारनं आयुष्य संपवलं, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT