Prof. Ram Shinde addressing youth representatives at the YIN Ministry 2026 session in Mumbai. Saam Tv
Video

मुंबईत सकाळ समूहाच्या माध्यमातून यिन मिनिस्ट्री 2026 अधिवेशन उत्साहात|VIDEO

YIN Ministry 2026 Mumbai Session Highlights: मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळ समूहाच्या माध्यमातून आयोजित ‘यिन मिनिस्ट्री 2026’ अधिवेशन उत्साहात पार पडले.

Omkar Sonawane

सकाळ समूहाच्या माध्यमातून आयोजित ‘यिन मिनिस्ट्री 2026’ अधिवेशन आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला विधानपरिषदेचे सभापती आमदार प्रा. राम शिंदे उपस्थित होते. त्यांनी युवा प्रतिनिधींशी संवाद साधत युवकांच्या प्रश्नांवर चर्चा केली तसेच नेतृत्व आणि शासन व्यवस्थेबाबत मार्गदर्शन केले.

राज्यभरातील युवा प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी झाले होते. यिन मिनिस्ट्री 2026 च्या नवव्या सत्रात निवडून आलेल्या प्रतिनिधींना आमदार प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते शपथ देण्यात आली. यावेळी, ‘यिन’च्या माध्यमातून भविष्यात राबवण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची आणि समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी कार्य करण्याची शपथ त्यांनी घेतली.

महाराष्ट्र राज्याच्या ‘यिन’ मंत्रिमंडळात माझी निवड झाल्याचा मला अभिमान असून ही संधी माझ्या जडणघडणीत मोलाची ठरेल, असा विश्वास व्यक्त करत विद्यार्थ्यांनी भविष्यातील उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच ‘यिन’ने दिलेली जबाबदारी, आचारसंहिता आणि नियमांचे काटेकोर पालन करून विधायक कार्य उभे करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

RBI Recruitment: इंजिनियर झालात? रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Solapur Temple Tourism: अक्कलकोट ते पंढरपूर, सोलापूरमधील या TOP 8 स्थळांना उन्हाळ्यात नक्कीच भेट द्या, मन होईल प्रसन्न

Ayan Ahmed Case: १८० मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या अयानचा नवा VIDEO समोर, तरुणाचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले

Summer Hair Care Tips: उन्हाळ्यात दररोज केस धुवावे की नाही? घाम आणि कोंडा होऊ नये म्हणून काय करावे?

SCROLL FOR NEXT