bar manager assault Saam tv
Video

धक्कादायक! बिल भरण्यावरून वाद; बार मॅनेजरला चौघांनी बेदम मारहाण|VIDEO

Shocking Assault at Lord's Bar in Wani: यवतमाळच्या वणीतील लॉर्ड्स बारमध्ये बिल भरण्यावरून वाद झाल्यानंतर बार मॅनेजरला चौघांनी मारहाण केल्याची घटना घडली. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून वणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

बार बंद करण्याची वेळ झाल्याने बिल भरण्यास सांगितल्याचा राग आल्याने ग्राहकाने मित्रांना बोलावून बार मॅनेजरवर चौघांनी मिळून हल्ला केल्याची घटना यवतमाळच्या वणी येथील वरोरा रोडवरील लॉर्ड्स बारमध्ये घडली. मारहाणीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मॅनेजर आनंदराव उईके यांच्या तक्रारीनुसार, शेख ताबीज शेख रानु हा बारमध्ये मद्यप्राशन करत होता. बार बंद करण्याची वेळ झाल्याने वेटरला बिल घेण्यास सांगितल्यानंतर ताबीजने वाद घातला. त्यानंतर त्याने फिरोज खान, साकिब शब्बीर खान आणि दोन विधिसंघर्ष बालकांना बोलावून घेत बार मॅनेजर उईके यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या वेटरलाही धक्का देण्यात आला. खाली पडलेल्या उईके यांना लाथांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी तक्रार दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आज पाऊल उचललंय, पुढे हात उचलला जाईल', ठाकरेंचा इशारा

वाहनचालकांनो लक्ष द्या! ठाणे-बेलापूर रोडवर ४ रात्र वाहतूक बंद; काय आहे कारण, पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Weight Loss : आठवड्याभरात बारीक व्हायचंय? रोज फक्त २० मिनिटं करा 'हे' काम, वजनात दिसेल फरक

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

SCROLL FOR NEXT