लासलगाव बाजार समितीत माथाडी कामगार आणि हमाल मापारी यांनी आजपासून कामबंद आंदोलन पुकारलं आहे. मजुरीची रक्कम मिळत नसल्याने हे कामबंद आंदोलन छेडण्यात आलं आहे. त्यामुळे लासलगाव बाजार समितीतील कांद्यासह अन्य शेतमालाच्या लिलावावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २ ते ३ महिन्यांपूर्वी याच कारणामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बेमुदत बंद राहिल्या होत्या, तर आता लासलगाव बाजार समितीनेदेखील कामबंद आंदोलन पुकारलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून व्यापारी आणि कामगार यांमध्ये मजुरी तसेच लेव्हीच्या प्रश्नावरुन वाद सुरु असलेले पाहायला मिळत आहेत. परंतु त्यावर अजूनही ठोस असा पर्याय काढण्यात आलेला नाही. लासलगाव बाजार समितीत कामबंद आंदोलन जरी सुरू असले तरी लासलगाव बाजार समितीत कांद्यासह सर्व लिलाव सुरळीतपणे सुरू राहतील अशी माहिती बाजार समितीच्या सचिवांनी माहिती दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.