Women supporters protest outside Matoshree opposing Halim Sheikh’s candidature for Mumbai Ward 96 and demanding a local candidate. Saam Tv
Video

उमेदवारीवरून मातोश्रीबाहेर महिलांचा गराडा; हालीम शेख यांच्या उमेदवारीला विरोध|VIDEO

Women Protest Against Halim Sheikh: मुंबईतील वॉर्ड क्रमांक 96 मधून हालीम शेख यांच्या उमेदवारीला बेहराम पाड्यातील ठाकरे गटाच्या महिलांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

Omkar Sonawane

मुंबईतील वॉर्ड क्रमांक 96 मधून हालीम शेख यांना उमेदवारी देण्यास बेहराम पाड्यातील ठाकरे गटाच्या महिलांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर बेहराम पाड्यातील अनेक महिला थेट मातोश्री परिसरात दाखल झाल्या असून त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.

बेहराम पाड्यातील महिलांचे म्हणणे आहे की, हालीम शेख यांना वॉर्ड क्रमांक 96 मधून तिकीट देऊ नये. स्थानिक पातळीवर स्वीकारार्ह नसलेला उमेदवार पक्षाने लादू नये, अशी ठाम भूमिका महिलांनी घेतली आहे.

दरम्यान, वॉर्ड क्रमांक 96 साठी अल्माझ झवेरी यांनाच उमेदवारी द्यावी, अशी ठोस मागणी महिलांनी केली आहे. अल्माझ झवेरी या स्थानिक प्रश्नांशी जोडलेल्या असून परिसरातील महिलांचा त्यांना मोठा पाठिंबा असल्याचा दावा आंदोलक महिलांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Corporation Election: पुण्यात काँग्रेसच्या हातात मशाल; काँग्रेस-ठाकरे सेनेचं जागावाटप जाहीर

मुंबईत भीषण अपघात, भरधाव बसने ४-५ जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू

दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलं, भाजपला दूर सारत राष्ट्रवादी एकत्र

मुंबईत राजकारण तापलं; निवडणुकीसाठी आतापर्यंत इतक्या उमेदवारांनी अर्ज घेतले, संपूर्ण माहिती एका क्लिकवर

भाजपात उपऱ्यांना उपरणे, निष्ठावतांची उपेक्षा, दलबदलू दिनकर पाटलांना निष्ठेसाठी रडू

SCROLL FOR NEXT