Nalasopara News Saam Tv
Video

Nalasopara: गटारावरील लोखंडी जाळीत महिलेचा पाय अडकला, जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल; VIDEO

Nalasopara News: नालासोपाऱ्यामध्ये रस्त्यावरुन जाणाऱ्या एका महिलेचा पाय गटारावरील लोखंडी जाळीत अडकला. बराच वेळाच्या प्रयत्नांनंतर स्थानिकांच्या मदतीने या महिलेचा पाय बाहेर काढण्यात आला. या घटनेत ही महिला जखमी झाली.

Priya More

नालासोपारातील जिजाई नगर परिसरात रस्त्याच्या बाजूला असलेल्या पालिकेच्या तुटलेल्या गटारात महिलेचा पाय अडकल्याची धक्कादायक घटना रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. गटारावर बसविण्यात आलेली लोखंडी जाळी तुटलेल्या अवस्थेत असल्याने महिलेला त्याचा अंदाज आला नाही त्यामध्ये आणि तिचा पाय खोलवर अडकला. या दुर्घटनेत महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत पालिकेच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तुटलेली गटारे आणि धोकादायक अवस्थेतील जाळ्यांकडे पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT