Instagram Reel Saam TV
Video

Viral Social Media News : इंस्टाग्रामवर दोन फॉलोअर्स कमी झाले, बायकोची नवऱ्या विरोधात थेट पोलिस ठाण्यात धाव|VIRAL VIDEO

Viral News : भांडी घासायला लावतो म्हणून बायकोने नवऱ्यावर आरोप केला, रिल्स बनवू न शकल्यामुळे तिच्या सोशल मीडिया करिअरवर संकट ओढवलं आहे. त्यामुळे तिने थेट पोलिस ठाण्यात जाऊन नवऱ्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उत्तर प्रदेशात एक अजब प्रकार घडला आहे. एका महिले थेट पोलिस ठाण्यात जावून अजब तक्रार दाखल करुन सर्वांनाच चकित केले आहे. तिच्या म्हणण्यानुसार, तिचे इंस्टाग्रामवर दोन फॉलोअर्स कमी झाले असून, याला जबाबदार तिचा नवरा आहे. कारण तो तिला घरकाम, विशेषतः भांडी घासायला लावतो, त्यामुळे ती वेळेवर रिल्स बनवू शकत नाही. यामुळे तिच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्ये घट झाली आहे, असा गंभीर आरोप तिने पोलिसांसमोर केला आहे.

या तक्रारीमुळे पोलिसही काही काळ संभ्रमात पडले होते. अखेरीस त्यांनी तिला समजावून घरी पाठवले आहे. सोशल मीडियाच्या युगात अशा विचित्र तक्रारींमुळे पोलिसांनाही नवनवीन समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही घटना सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Fort : भक्कम दुहेरी तटबंदी अन् वैभवशाली इतिहास, सोलापूरमध्ये तलावाच्या काठी वसलाय भव्य किल्ला

Maharashtra News Live Update: विदर्भाचा मुख्यमंत्री असूनही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Accident: समृद्धी महामार्गावर भयंकर अपघात; पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बसचा चेंदामेंदा, प्रवासी बसमध्येच अडकले

Deool Band 2 Collection : स्वामी भक्तीत प्रेक्षक तल्लीन! प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २'चं बॉक्स ऑफिसवर वर्चस्व, वाचा संडे कलेक्शन

Chanakya Niti: या ५ कारणांमुळे नवरा बायकोत होतात वाद, वेळीच घ्या योग्य निर्णय अन्यथा...

SCROLL FOR NEXT