Forest department officials and locals gather outside the liquor shop in Tonk, Rajasthan, where a wild leopard was trapped and safely rescued after a 5-hour operation. saam tv
Video

बिबट्या थेट दारूच्या दुकानात शिरला अन् पुढं काय घडलं? पाहा थरार VIDEO

Leopard Attacks Two People Inside Wine Shop In Tonk: राजस्थानच्या टोंक जिल्ह्यात शिकारीच्या शोधात आलेला बिबट्या थेट दारूच्या दुकानात घुसला. बिबट्याच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून, ५ तासांच्या थरारक मोहिमेनंतर बिबट्याला सुरक्षित जेरबंद करण्यात आले.

Omkar Sonawane

राजस्थानमधील टोंक जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. शिकारीच्या शोधात आलेला बिबट्या थेट एका दारूच्या दुकानात घुसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याने दुकानात शिरताच दोन जणांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ दुकानाचं शटर बंद करून बिबट्याला आतमध्येच अडकवलं आणि वनविभागाला माहिती दिली. यानंतर जयपूरहून विशेष पथक घटनास्थळी दाखल झालं. वनविभागाच्या पथकाने सुमारे ५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला सुरक्षितरित्या जेरबंद केलं. या संपूर्ण बचाव मोहिमेदरम्यान मोठी गर्दी जमली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान जंगलातील अधिवास कमी होणं आणि अन्नाच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीच्या जवळ येणं, ही चिंतेची बाब असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सांगली हादरली! शेळ्या चरायला गेलेल्या माजी पोलीस पाटलावर तरसाचा भयानक हल्ला, जागीच मृत्यू

Shocking : अंकित बालियान हत्या प्रकरणात मोठी अपडेट! पोलिसांनी २ आरोपींचा केला एनकाऊंटर

Maharashtra News Live Update : भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

Swine flu cough: H1N1 झाल्यानंतर खोकला किती दिवस राहतो?

जमीन मालकांसाठी सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल, जाणून घ्या 'हा' महत्त्वाचा नियम

SCROLL FOR NEXT