young woman says Gen Z wants Rahul Gandhi as the next Prime Minister saam tv
Video

पुढचा पंतप्रधान कोण? 'छात्रों की गुंज'मध्ये तरुणीनं थेट नाव घेतलं, काय म्हणाली ही तरुणी? पाहा VIDEO

Rahul Gandhi interacts with students at Chhatron Ki Goonj event in Pune : पुण्यात छात्रों की गुंज कार्यक्रमात राहुल गांधी उपस्थित तरुणींशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी आलेल्या एका तरुणीनं थेट देशातील शिक्षण व्यवस्थेचा मुद्दा उचलला. भाजपमुळेच शिक्षण व्यवस्था घाण झालीये, असा आरोप या तरुणीने केलाय. ही तरुणी काय म्हणाली, बघा व्हिडिओ...

Bharat Mohalkar

भाजपमुळे शिक्षण व्यवस्था घाण झालीय, अशी भावना व्यक्त करतानाच, डीग्री विकत घ्यावी लागते, अशी व्यथा एका तरुणीनं मांडलीय. ही तरुणी पुण्यात राहुल गांधींच्या उपस्थितीत होणाऱ्या छात्रों की गुंज या कार्यक्रमासाठी आली होती. शिक्षण व्यवस्थेवर बोट ठेवताना या तरुणीनं आक्रमक भूमिका मांडली.

ही तरुणी म्हणाली की, ''आम्हाला सुशिक्षित पंतप्रधान हवा आहे. आम्हाला असुशिक्षित पंतप्रधान नको. आता आम्हाला मोदी नकोत. जेन झींना आता राहुल गांधी हेच पंतप्रधान म्हणून हवेत.''

या कार्यक्रमात राहुल गांधींना प्रश्न विचारण्याची संधी मिळाली तर, आम्ही तुम्हाला निवडून देऊ, असं त्यांना सांगू. शिक्षण व्यवस्था खूप घाण झाली आहे. कुठली डीग्री घ्यायची असेल तर ती विकत घ्यावी लागते. आम्हाला आमच्याच शिक्षणासाठी डोनेशन द्यावे लागते. शिक्षणासाठी पैसे खर्च करायचे आणि याच भारतात सर्व्हाइव्ह करायचे अशी परिस्थिती आहे. भाजपने शिक्षण व्यवस्था घाण केली आहे. शिक्षण व्यवस्था ही राहुल गांधींशिवाय कोणीही व्यवस्थित करू शकत नाहीत. ते स्वतः केंब्रिज युनिव्हर्सिटीतून शिकलेले आहेत. त्यामुळे आम्हाला सुशिक्षित पंतप्रधान हवे आहेत, असेही ही तरुणी म्हणाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : खूप उशीर एकाच जागी बसल्याने शरीरात काय बदल होतात?

निधीमुळे अडले, आमदार मंत्र्यांसमोरच रडले, निधीवाटपावरून भाजप-शिंदेसेनेत पुन्हा संघर्ष

11 लाखांचे 15 कोटी करणारा नवा खरात, श्रीमंतीची हौस, भोंदूनं पाडला पैशांचा पाऊस?

ठिय्या मांडणाऱ्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी, 550 अधिकाऱ्यांची मूळ विभागात रवानगी

Kapurche Pani: १ तुकडा कापूर पाण्यास मिसळून आंघोळ केल्याने काय होते?

SCROLL FOR NEXT