Devendra Fadnavis On Mayor Post with Shinde Sena saam tv
Video

Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कोण? भाजप की शिंदेसेनेचा...; देवेंद्र फडणवीसांनी एकाच वाक्यात विषय संपवला

Mumbai Municipal Mayor Race : मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीनं स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौरपदाची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय.

Nandkumar Joshi

राज्यात २९ महापालिकांच्या निवडणुका झाल्या असल्या तरी, मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालाकडं अख्ख्या देशाचं लक्ष लागलं होतं. मुंबईत भाजप-शिंदेंच्या शिवसेनेनं बहुमत मिळवलं आहे. तर ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांच्या युतीनं ७० हून अधिक जागांवर विजय मिळवला. आता मुंबईचा महापौर कोण अशी चर्चा सुरू झाली आहे.

मुंबईत ८९ जागा जिंकून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर युतीत असलेल्या शिंदेंच्या सेनेने २९ जागांवर विजय मिळवला आहे. आता महापौरपदासाठी दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. आमचा महापौर असावा, अशी इच्छा शिंदेंच्या सेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक आणि काही नेत्यांनी व्यक्त केली होती. त्याबाबत प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता, काही वाद होणार नाहीत. शिंदे, मी आणि आमच्या दोन्ही पक्षांचे नेते बसून निर्णय घेऊ, असे फडणवीसांनी सांगितले.

मुंबई महापौरपदाबाबत आम्ही बसवून ठरवू. यात महापौर कोण, कधी होणार, किती वर्षे होणार, या सगळ्या गोष्टी शिंदे आणि मी, तसेच आमचे दोन्ही पक्षांचे नेते असे आम्ही सगळे एकत्रित निर्णय घेऊ. काही वाद यात होणार नाही. छान पद्धतीने दोन्ही पक्ष मुंबई चालवून दाखवू, असे फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरे ठरणार किंगमेकर; महापालिकेवर सत्तास्थापनेसाठी भाजप आणि काँग्रेसचाही दावा

Sunday Horoscope: मेहनीला मिळेल यश, महत्त्वाची कामं होतील पूर्ण; वाचा रविवारचे राशीभविष्य

एकनाथ शिंदेंचे नगरसेवक फुटणार? महापालिका निवडणूक निकालानंतर मुंबईत 'राजकीय हायअलर्ट'!

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे खून प्रकरणात लक्ष घालणार मुख्यमंत्री साहेब दिलेला शब्द पाळावा: मनोज जरांगे पाटील

मुंबईत सत्ता येताच मुख्यमंत्री फडणवीसांची मुंबई आणि मराठी माणसासाठी मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT