Video

Pahalgam Terror Attack: उपमुख्यमंत्री शिंदेंनी काश्मीरमध्ये जाण्याची काय गरज? 'साम' टीव्हीचे सवाल काय?

Eknath Shinde In Kashmir: पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २८ पर्यटकांचा मृत्यू, अनेक जखमी. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला, यात २८ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश असून, डोंबिवलीचे तिघे, पुण्याचे दोन आणि पनवेलमधील एक नागरिक यामध्ये आहेत. या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. अशातच एकनाश शिंदे हे स्वतः खासगी विमानाने श्रीनगरला गेले आहेत. मात्र आता साम टीव्हीने शिंदेंच्या या दौऱ्यावरुन काही सवाल उपस्थित केले आहेत.

काश्मीरमध्ये सरकारचे प्रतिनिधी म्हणून आधीच गिरीष महाजन गेलेले आहेत आणि असं असताना एकनाथ शिंदे तिथे कशासाठी गेले? पार्थिव महाराष्ट्रात आलेली आहेत. पर्यटकांना आणण्यासाठी मंत्री महाजन आणि सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. मग अशातच शिंदेंनी तिथे जाण्याचं कारण काय? ते कशासाठी गेले आहेत? आधीच सुरक्षी यंत्रणा व्यस्त आहेत. मंत्र्याच्या दौऱ्यामुळे त्यांच्यावरील आणखी ताण वाढणार नाही का? असा हा सवाल आहे आणि शिंदे नेमकं का गेले आहेत असा सवाल साम टीव्हीने उपस्थित केला आहे.

नेमक साम टीव्हीने काय सवाल उपस्थित केले आहेत पाहा सविस्तर

१. उपमुख्यमंत्री शिंदेंनी काश्मीरमध्ये जाण्याची काय गरज?

२. मंत्री गिरीष महाजन असताना शिंदेंना जाऊन काय मिळणार आहे?

३. शासनाचे प्रमुख म्हणून मुंबईतून सूत्र हलवता आली असती?

४. अगोदरच सुरक्षा यंत्रणेवर असलेला ताण वाढवण्याची काय गरज होती?

५. नेते आणि मंत्र्यांना आचारसंहितेची गरज आहे की नाही?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv Crime : बँकेची लोखंडी खिडकी तोडून चोरट्यांचा आत प्रवेश; दरोड्याचा प्रयत्न फसला

Sangali Nag Panchami : सांगलीकरांची २३ वर्षांची प्रतीक्षा संपली, जिवंत नाग पकडण्याला परवानगी, नेमकं प्रकरण काय?

Honey Trap : नाशिकनंतर सांगलीतही हनी ट्रॅप, २ माजी मंत्र्यांचा सहभाग, खडसेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update : माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना, राजीनामा देणार का?

Blocked heart arteries: शरीरात होणारे 'हे' 5 बदल सांगतात हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक; लक्षणं वेळीच ओळखून करा उपचार

SCROLL FOR NEXT