Chandipura virus outbreak in Gujarat saam tv
Video

Chandipura Virus: २२ मुलांचा बळी घेणारा चांदीपुरा व्हायरस आहे तरी काय? सर्वाधिक धोका कुणाला?

Chandipura virus children at risk : २२ मुलांचा बळी घेणारा चांदीपुरा व्हायरस नेमका काय आहे? या विषाणूचा सर्वाधिक धोका कोणाला आहे, हे जाणून घ्या.

Nandkumar Joshi

यंदाच्या पावसाळ्यात चांदीपुरा व्हायरसने (CHPV) गुजरातमध्ये थैमान घातले आहे. आतापर्यंत २२ मुलांचा या विषाणूने बळी घेतला आहे. तर इतर सात जणांवर उपचार सुरू आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री प्रफुल पानसेरिया यांनी सोमवारी ही माहिती दिली.

गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचे आतापर्यंत १८४ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यातील ३५ जण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. ११ जणांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी नेण्यात आले असून, त्याचा अहवाल अद्याप बाकी आहे. सर्व बाधित रुग्ण हे १५ वर्षांखालील असल्याची माहिती आहे.

बाधित आणि संशयित रुग्णांना गांधीनगर, हिंमतनगर, पाटण, राजकोट, भावनगर येथील सरकारी रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. गुजरातमधील आरोग्य यंत्रणा सध्या अलर्टवर आहे. अवयव निकामी होणे टाळण्यासाठी लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लक्षणे काय ?

मुलांना अचानक प्रचंड ताप येतो.

मुलांची शुद्ध हरपते. सुस्ती येते.

वारंवार उलटीचा त्रास सुरू होतो

झटके किंवा फिट्स येते

तीव्र डोकेदुखी

सर्वाधिक धोका हा १५ वर्षांखालील मुलांना असल्याचे सांगण्यात येते

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT