Walmik Karad News SaamTv
Video

Walmik Karad News : वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास की तुरुंगवारी टाळण्याचा प्लान; पाहा स्पेशल रिपोर्ट

Walmik Karad Latest News : गेल्या तीन दिवसांपासून वाल्मिक कराड बीडच्या जिल्हा रुग्णालयात आयसीयूत आहे...कराडला पोटदुखीचा त्रास असल्याचं सांगितलं जातंय... मात्र त्यावरुन नवा वाद पेटलाय.. कराडची पोटदुखी खरी की खोटी? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

Saam Tv

भरत मोहळकर, साम टीव्ही

सरपंच हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराडवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत... वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास सुरु झाल्याने त्याला आयसीयूत भरती करण्यात आलंय... तर कराडच्या काही चाचण्याही करण्यात आल्यात.. कराडला आयसीयूत दाखल कऱण्याला अंजली दमानिया आणि जितेंद्र आव्हाडांनी विरोध दर्शवला.. कराडला आर्थर रोड जेलमध्ये हलवण्याची मागणीही दमानियांनी केलीय.

वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूत का नेलं? पाहूयात....

वाल्मिक कराड आयसीयूत का?

कराडला पोटदुखी सुरु झाली

कराडने स्लीप एप्निया असल्याचा दावा केला

कराडच्या छातीचा सीटी स्कॅनही करण्यात आला

बुधवारी बीड न्यायालयाने कराडची सीआयडी कोठडी संपवून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय....मात्र कराडला आयसीयूत हलवण्यात आलंय.. कराड सलग 3 दिवसांपासून आयसीयूत आहे...त्यामुळे खरंच कराडला पोटदुखीचा त्रास होतोय की तुरुंगवारी टाळण्यासाठी केलेला हा बनाव आहे हे स्पष्ट होणं आवश्यक आहे.. त्यामुळे दमानियांच्या मागणीनुसार कराडचे रिपोर्ट सार्वजनिक केले जाणार का? आणि राजकीय दबाव झुगारण्यासाठी कराडला आर्थर रोड तुरुंगात हलवलं जाणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025: महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरच नाही तर देशातील ७ प्रसिद्ध ठिकाणीही श्राद्ध, पिंडदान करतात

Pune Rain : पुण्यात मुसळधार पावसाचा कहर, रस्ते जलमय; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर, VIDEO

Donald Trump: अपघातातून थोडक्यात बचावले डोनाल्ड ट्रम्प; हवेतच होणार होती दोन विमानांची धडक

Maharashtra Live News Update: पुण्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

Tanushree Dutta: 'फार्महाऊसवर न येता, तू हिरोईन...'; तनुश्री दत्ताने बॉलिवूडवर पुन्हा केले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT