Mumbai Rain 
Video

Mumbai Rain :वडाळ्यात रेल्वे ट्रॅकवर पाणीच पाणी, व्हिडिओ पाहून धडकी भरेल

वडाळा रेल्वे ट्रॅकवर मुसळधार पावसामुळे पाणी साचले आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. ट्रेन अर्धा तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Namdeo Kumbhar

मुंबईत मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने वडाळा परिसरात पाणी साचायला सुरूवात झाली आहे. वडाळा रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेन सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या लोकल अर्धा तास उशिराने धावत आहेत. पाणी साचल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, तर काही प्रवासी ट्रॅकवरून चालताना दिसत आहेत. हवामान विभागाने पुढील २४ तास मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महानगरपालिकेने नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. खासगी आणि सरकारी कार्यालयाला सुट्टी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT