VS Gaitonde’s iconic 1970 masterpiece sold for ₹67.08 crore, setting a new benchmark in India’s art auction history. Saam Tv
Video

भारतातील सर्वात महागड्या चित्राचा लिलाव, वी.एस. गायतोंडे यांच्या कलेला मिळाले 67.08 कोटी रुपये, VIDEO

Iconic VS Gaitonde Masterpiece Fetches: 1924 मध्ये जन्मलेले प्रसिद्ध कलाकार वी.एस. गायतोंडे यांचे 1970 मधील एक कॅनव्हासवरील ऑईल पेंटिंग दिल्लीतील सैफ्रनआर्ट लिलावात 67.08 कोटी रुपयांत विकले गेले.

Omkar Sonawane

1924 मध्ये जन्मलेले प्रसिद्ध कलाकार वी.एस. गायतोंडे यांनी सन 1970 मध्ये तयार केलेली एक पेंटिंग नुकतीच लिलावात 67.08 कोटी रुपये मध्ये विकली गेली आहे. या विक्रीमुळे ही पेंटिंग भारतातील लिलावात विकलेली दुसरी सर्वात महाग पेंटिंग बनली आहे.

गायतोंडे यांचे हे चित्र अंदाजापेक्षा सुमारे तीनपट अधिक किंमतीत लिलावात विकले गेले. कॅनव्हासवर तयार केलेले हे ऑईल आर्टवर्क दिल्लीमध्ये आयोजित सैफ्रनआर्टच्या 25व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने झालेल्या लाईव्ह ईव्हनिंग सेलमध्ये विकले गेले.

67 कोटीत काय काय मिळू शकते?

ही साधी दिसणारी पेंटिंग 67.08 कोटी रुपयांत विकली गेली आहे. या रकमेने तुम्ही साधारण 150 मर्सिडीज कार्स खरेदी करू शकता. भारतात मर्सिडीजची सुरुवातीची किंमत अंदाजे 44.5 लाख रुपये आहे.

सर्वात महाग पेंटिंग कोणाची आहे?

प्रसिद्ध चित्रकार एम.एफ. हुसैन यांच्या 1950 च्या दशकातील एका खास पेंटिंगला अनटाईटल्ड (ग्राम यात्रा) लिलावात 118 कोटींपेक्षा जास्त रकमेन विकले गेले. त्यामुळे ही आधुनिक भारतीय कलेतील सर्वात महाग पेंटिंग ठरली आहे. या पेंटिंगचे खरेदीदार होते आर्ट कलेक्टर व समाजसेवी किरण नादर (अरबपति शिव नादर यांच्या पत्नी).

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सुप्रिया सुळेंचा वंचितच्या शहर अध्यक्षांना फोन...

NPS Rule: कामाची बातमी! NPS च्या नियमात मोठा बदल; ₹५००० महिन्याला गुंतवा अन् ९२ लाख मिळवा

Christmas Celebration : भारतात ख्रिसमस कसा साजरा केला जातो? जाणून घ्या

Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्रीची हत्या, चाकूने सपासप वार करत संपवलं; बॉयफ्रेंडला अटक

Western Railway : पश्चिम रेल्वेवर 'या' दिवशी ३०० लोकल रद्द! नेमकं कारण काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT