Vitthal Temple Manager Manoj Shrotri faces corruption allegations, sent on leave after temple committee’s urgent decision Saam Tv
Video

Pandharpur News: विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकांना पाठवलं सक्तीच्या रजेवर, कारण काय? VIDEO

Mandap Tender Scam During Ashadhi Ekadashi: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना आषाढी यात्रेतील मंडप ठेक्यावरून झालेल्या आर्थिक व्यवहाराच्या आरोपामुळे सक्तीची रजा देण्यात आली.

Omkar Sonawane

पंढरपूर: आषाढी यात्रेनंतर आता पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नवा वाद उफाळून आला आहे. मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आषाढी यात्रेदरम्यान दर्शन रांगेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपाच्या ठेक्याबाबत व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी एका ठेकेदाराकडून आर्थिक व्यवहार केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत समितीने चौकशीचा निर्णय घेतला असून चार सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती आठ दिवसांत चौकशीचा अहवाल सादर करणार आहे.

या संदर्भात मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी माहिती दिली. आता या प्रकरणाचा पुढील तपास व चौकशी समितीचा अहवाल काय निष्कर्ष देते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Parenting Tips : मुलांना ओरडल्यानंतर पालकांनी चुकूनही करू नका 'ही' चूक, विश्वासाचं नातं एका क्षणात तुटेल

Pune : पुण्यात पोलिसांनीच केले पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'! डमी डिलिव्हरी बॉय बनवून केला मोठा पर्दाफाश

Actor Home Fraud: मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून करतोय धावपळ

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

SCROLL FOR NEXT