Blind but spiritually guided Devotees on a 415 km devotional march to Pandharpur for Lord Vitthal darshan. Saam Tv
Video

Ashadh Wari: दृष्टीहीन पण भक्तीने भरलेले डोळे; दिव्यांग वारकऱ्याचा विठू माऊलीसाठी 400 किलोमीटर पायी प्रवास|VIDEO

From Darkness to Divinity: ४१५ किमी पायी चालत दृष्टिहीन वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले आहेत. भक्तीच्या जोरावर ते एकमेकांना आधार देत पंढरपूरकडे वाटचाल करत आहेत. ही वारी संत सूरदास महाराज दिव्यांग संघ गोरेगाव, हिंगोली येथून सुरु झाली आहे.

Omkar Sonawane

बालाजी सुरवसे, साम टीव्ही

पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाची आस ही प्रत्येकाला लागलेली असते आणि याच आसेपोटी तब्बल 415 किलोमीटर पायी अंतर कापत दृष्टिहीन असलेले वारकरी एकमेकांना आधार देत पंढरपूरच्या दिशेने मजल दरमजल करत निघाले आहेत. अनेक वारकरी दिंड्या पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात. मात्र, या वारीत सामील झालेले वारकरी हे दृष्टीहीन नसून केवळ त्यांना त्यांच्या डोळ्यापुढे अंधार जरी असला तरी विठ्ठलाचे दर्शन व विठ्ठल कायम दिसतात.

मनात विठुरायाच्या दर्शनाची आस व डोळ्यापुढे विठुरायांचे चित्र घेऊन दिसत नसलं तरी तब्बल 415 किलोमीटरचा प्रवास मजल दर मजल करत हे वारकरी एकमेकांचा आधार बनत विठुरायांच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाले आहेत. ही दिंडी दिव्यांग संघ पुनर्वसन केंद्र गोरेगाव जिल्हा हिंगोली येथून निघाली संत सूरदास महाराज दिव्यांग संघ यांच्या माध्यमातून ही दिंडी वाशिम ते पंढरपूर पर्यंत काढली जाते. ती धाराशिव जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर कळंब शहरात ही दिंडी मुक्कामी थांबली होती. या दिंडीत एकूण 10 दिव्यांग वारकरी आहेत यांची देखभाल करण्यासाठी पाच वारकऱ्यांची नियुक्ती देखील केली गेली. पूर्णपणे दृष्टीही सृष्टीचा रंग बोध नसलेले एकमेकांना साथ घालत व साथ देत या अन्न वारकऱ्यांनी कळंब पर्यंतचा प्रवास सुखरूप पार केला आहे. त्यांच्या तोंडातून निघणारे हे अभंग व त्यांची विठ्ठल नामाची भक्ती हीच त्यांना पंढरपूरकडे पुढे जाण्यासाठी मदत करत असल्याचे स्वतः सांगता आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

SCROLL FOR NEXT