sangli news  saam tv
Video

Vishal Patil: सांगलीच्या महापूराला जबाबदार कोण? खासदार विशाल पाटील यांचा सरकारला सवाल|VIDEO

Sangli Floods: अलमट्टीमुळे पूर येत नसेल तर राज्य सरकारने महापुराला आपण जबाबदार असल्याचे मान्य करावे. पुरावे माझ्याकडे द्यावेत मी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारशी चर्चा करायला तयार आहे असे आव्हान खासदार विशाल पाटील यांनी केले.

Omkar Sonawane

सांगली: अलमट्टी धरणामुळे सांगली आणि परिसरात महापूर येतो, असे वारंवार सांगण्यात येते. मात्र जर अलमट्टीमुळे पूर येत नसेल, तर राज्य सरकारने या महापुराला स्वतः जबाबदार असल्याचे स्पष्टपणे मान्य करावे, अशी ठाम भूमिका सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी मांडली आहे. याचबरोबर, पुराचा खरा कारणमिमांसा आणि केंद्र व कर्नाटक सरकारशी चर्चा करण्यासाठी आवश्यक पुरावे सरकारने द्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

विशाल पाटील म्हणाले, अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत राज्य सरकारने किंवा कोणत्याही संबंधित विभागाने आजवर कोणतीही अधिकृत तक्रार नोंदवलेली नाही. त्यामुळे सरकारचाच अलमट्टीमुळे महापूर येतो असा दावा नसावा. त्यांनी यावरून राज्य सरकारवर टीका करत म्हटले की, महाराष्ट्र सरकारने जर तक्रारच नोंदवलेली नाही, तर कर्नाटक सरकार अलमट्टी उंची वाढीबाबत वक्तव्य करते आणि याला जबाबदार महाराष्ट्र सरकार ठरते.

जर राज्य सरकारला वाटत असेल की अलमट्टीमुळे पूर येत नाही, तर त्या संदर्भातील दस्तऐवज व पुरावे माझ्याकडे द्यावेत. मी स्वतः केंद्र सरकार व कर्नाटक सरकारसोबत चर्चा करून या प्रश्नाला तोडगा काढण्यासाठी तयार आहे, असेही खासदार पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

सांगली आणि परिसरातील वारंवार होणाऱ्या महापुरांचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून या वक्तव्यामुळे राजकीय व प्रशासकीय पातळीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय वडूजला व्हावे, जनसंघर्ष समितीचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू

Mulshi Waterfall : ५ ते १० मिनिटांच्या ट्रेकनंतर दिसतो 'हा' धबधबा, मुळशीजवळ लपलंय सुंदर ठिकाण

Famous Actor : शूटिंगदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्याला चावला विषारी किडा; रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती गंभीर

Pune Traffic Change: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! आज शहरातील प्रमुख रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Rain Alert : आजही मुसळधार पाऊस! पुण्यासह घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट; मुंबईत पावसाची काय स्थिती? वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT