Latur Bailpola Saam tv
Video

Latur: मिरवणुकीदरम्यान बैल अचानक उधळला, ग्रामस्थ सैरावैरा पळू लागले; VIDEO व्हायरल

Latur Bailpola: लातूरमध्ये बैलपोळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये बैल उधळल्याची घटना घडली. त्यामुळे गावकरी घाबरू सैरावैरा पळू लागले. याचा व्हिडीओ समोर आला असून व्हायरल होत आहे.

Priya More

बैलपोळ्यानिमित्त लातूर जिल्हाभरात बैलांची मिरवणूक काढण्यात आली. अशाचप्रकारे लातूरच्या खरोळा गावात थाटामाटात बैलांची मिरवणूक काढण्यात आली होती. पण या मिरवणुकीदरम्यान एक बैल अचानक उधळला. बैलाने धूम ठोकली आणि ग्रामस्थांची धावपळ झाली. सर्वजण घाबरून सैरावैरा पळू लागले. बैल उधळतानाचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

तत्तापुरे यांचा लक्षा नावाचा बैल सजावट करून आणि सुंदर पद्धतीने रंगरंगोटी करून सजवून मिरवणुकीसाठी आणला होता. हा लक्षा इतर बैलांमध्ये खूपच आकर्षक दिसत होता. मात्र अचानक बैल उधळल्याने मिरवणुकीमध्ये जमलेल्या ग्रामस्थांची धावपळ उडाली. तर यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. या लक्षा नावाच्या बैलाने धूम ठोकून थेट शेतात जाऊन दावणीला थांबला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! दुसऱ्याशी लग्न ठरल्याचा राग, तरुणाने घरात घुसून गर्लफ्रेंडवर चाकूने केले सपासप वार

LPG Rule: मोठी बातमी! १ मेपासून एलपीजी सिलिंडरच्या नियमात मोठे बदल, सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

पावसाच्या प्रत्येक थेंबाची अचूक नोंद होणार, पुण्यातील दाम्पत्यानं बनवलं 'पर्जन्यमापक यंत्र'

मानखुर्दमध्ये क्रेन कोसळली, मुंबईची वाहतूक 22 तास ठप्प

कामगारांच्या नोकरीवर टांगती तलवार? कामगारांवर आता कायद्यानं कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT