Vijayapura SBI branch looted thieves escape with 58 kg gold and ₹8 crore cash in filmy style Saam Tv
Video

SBI बँकेत सिनेस्टाईल दरोडा; 58 किलो सोनं आणि 8 कोटी कॅश लुटलं|VIDEO

SBI Heist in Vijayapura: कर्नाटकमधील विजयपूरा येथे एसबीआय शाखेत तब्बल 58 किलो सोनं आणि 8 कोटी रुपये रोख घेऊन पाच दरोडेखोर फरार झाले.

Omkar Sonawane

विजयपुरा (कर्नाटक) : कर्नाटकमधील विजयपुरा जिल्ह्यातील चादचान येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत तब्बल पाच दरोडेखोरांनी चित्रपटाला साजेल असा दरोडा टाकला. लष्करी वेष परिधान करून आणि चेहऱ्यावर मास्क घालून बँकेत शिरलेल्या दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना बंधक बनवलं.

या कारवाईदरम्यान त्यांनी बँकेतून तब्बल 58 किलो सोनं आणि सुमारे 8 कोटी रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेनंतर दरोडेखोरांनी वापरलेली कार महाराष्ट्रातील पंढरपूर परिसरात सोडून दिल्याचे आढळून आले. या पार्श्वभूमीवर कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिसांनी संयुक्तपणे सर्च ऑपरेशन सुरू केले असून, दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गस्त वाढवण्यात आली आहे. या दरोड्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून दरोडेखोरांना लवकरात लवकर गजाआड करण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

...तर एकही विमान उडू देणार नाही; नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनानंतर भूमीपूत्रांकडून घोषणाबाजी

Maharashtra Live News Update : पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात

ManaChe Shlok: ...तर 'मनाचे श्लोक' चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही; हिंदू संघटना आक्रमक, कारण काय?

Maharashtra Politics: मोठी बातमी! PM मोदींनी बोलावली तातडीची बैठक, आमदार-खासदारांना देणार कानमंत्र

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाची बातमी! शिपाई ते अधिकारी, कोणाचा पगार कितीने वाढणार?

SCROLL FOR NEXT