विद्यानंद बापट यांच्या आईवडिलांनाही पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.  Saam TV
Video

Vidyanand bapat Protection : विद्यानंद बापट यांच्या आई-वडिलांनाही २४ तास पोलीस संरक्षण

why Vidyanand Bapat parents got 24 hour police protection : डीजे बंदीचा आग्रह धरणाऱ्या विद्यानंद बापट यांना पोलीस संरक्षण दिल्यानंतर आता त्यांच्या आई-वडिलांनाही २४ तास संरक्षण देण्यात आलं आहे.

Nandkumar Joshi

अमोल कलये, साम टीव्ही | रत्नागिरी

Vidyanand Bapat parents police security in Ratnagiri : पुण्यातील गणेशोत्सवात डीजे, लाउडस्पीकर, रहदारीच्या रस्त्यांवरून विसर्जन मिरवणुकांवर बंदी घालण्याच्या मागणीचा दुराग्रह धरणाऱ्या विद्यानंद बापट यांच्या आई-वडिलांनाही २४ तास पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. विद्यानंद यांना मारहाण झाल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्रालयानं गंभीर दखल घेत त्यांना २४ तास संरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. आता त्याच्या आई-वडिलांच्या सुरक्षेची चिंता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने त्यांनाही २४ तास संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाल्यानंतर रत्नागिरीतील मूळ गावी असलेल्या चिंताग्रस्त आई-वडिलांनी तातडीने त्यांना फोन करून विचारपूस केली होती. तसेच विद्यानंदच्या डीजेबंदीच्या मुद्द्यालाही पाठिंबा दिला होता. विद्यानंद यांचे आई-वडील ते रत्नागिरीतील गोळप गावात राहतात. त्यांनाही पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. दोन पोलीस कॉन्स्टेबल २४ तास त्यांच्या घरासमोर तैनात असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डाॅल्बी बाबतच्या नियमांचे पालन करा; राज्यमंत्री योगेश कदम यांचे अहवान

Wisdom Teeth: बुद्धीशी अक्लकदाढचा संबंध काय, प्रत्येकाला का येत नाही अक्कलदाढ? जाणून घ्या भन्नाट कारण

Skin Care: चेहऱ्याच्या फ्रेशनेस आणि ग्लोसाठी रोज रात्री वापरा हा घरी तयार केलेला स्प्रे, स्किन प्रोब्लेम होतील दूर

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचं पुन्हा ऑपरेशन टायगर, ठाकरे गटाचे 14 आमदार फुटणार?

Maharashtra Village : भारतातील रहस्यमयी गाव! जेथे घरांना, दुकानांना दरवाजे अन् कुलूप नाही

SCROLL FOR NEXT